Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • दत्त जयंतीनिमित्त दुमदुमली नृसिंहवाडी; दोन लाख भाविकांची रेलचेल
Top News

दत्त जयंतीनिमित्त दुमदुमली नृसिंहवाडी; दोन लाख भाविकांची रेलचेल

Decorated Nrusinhwadi temple filled with devotees on Datta Jayanti

कोल्हापूर : आज दत्त जयंती असल्यामुळे भाविकांची दत्त मंदिरात प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. खास म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातील दूसरा गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुहेरी दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. यामुळे लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे.

दत्त संप्रदायाची राजधानी असणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी याठिकाणी देखील आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवाराचा दुहेरी दुग्धशर्करा योग साधून आल्याने भाविकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. या ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसत आहे. का मध्यरात्रीपासूनच शिरोळ-कुरुंदवाड मार्गावर हजारो भाविक “श्री गुरुदेव दत्त” नामजप करत थंडीला तोंड देत पायी चालत नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत.

आज दिवसभरात दत्त जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांतून किमान दीड ते दोन लाख भाविक दर्शनाला येत आहेत. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी शिरोळ पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदाचा उत्सवाचा मुख्य मान हा विनोद पुजारी (राजोपाध्ये) कुटुंबाकडे आहे.

हे ही वाचा : 2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शनी करणार या राशीत संक्रमण; या राशींना होणार फायदा

आजचे प्रमुख धार्मिक विधी (Datta Jayanti Nrusinhwadi)

– पहाटे काकड आरती

– षोडशोपचार पूजा

– पंचामृत अभिषेक

– महापूजा

– दुपारी पवमान पठण व पंचपदी कीर्तन

– दुपारी ४ वाजता श्रींची उत्सव मूर्ती गाभाऱ्यात आणणे

– सायंकाळी ५ वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा

– रात्री पालखी सोहळा

असे कार्यक्रम आज पार पडणार आहेत. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, रंगबिरंगी विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात उजळून निघाला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts