Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर सावधान ! समुद्राला मोठी भरती येणार
Mumbai

समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर सावधान ! समुद्राला मोठी भरती येणार

High tides warning at the beach; visitors advised to stay cautious

high tides beach warning : मुंबईकरांनो सावधान! जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण 4 ते 7 डिसेंबर दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. याशिवाय प्रशासनाने भरतीचे टाईमटेबल देखील जारी केले आहे.

दिनांक 4 ते 7 डिसेंबर या तीन दिवस समुद्राला भरती येणार असून समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

५.०३ उंचीच्या लाटा उसळणार

समुद्रात 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामुळे नागरिकांनी मोठी भरती असल्याने भरतीच्या कालावधीदरम्यान समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.

हे ही वाचा : बुरख्याचा वाद पेटला! “उपोषण करू पण, कॉलेजच्या आदेशाचं पालन नाही…” विद्यार्थ्यांचा संताप

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना आवाहन

6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक अनुयायी मुंबईच्या दिशेने येतात. त्यादरम्यान अनेक जण समुद्रकिनारी देखील येतात. त्यानुसा चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी. शक्यतो समुद्रकिनारी जाणे टाळावे.

४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतींचे वेळापत्रक

१. गुरुवार, दि. ०४.१२.२०२५ – रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची – ४.९६ मीटर

२. शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची – ४.१४ मीटर

३. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची – ५.०३ मीटर

४. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची – ४.१७ मीटर

५. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची – ५.०१ मीटर

६. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची – ४.१५ मीटर

img

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts