• Home
  • महाराष्ट्र
  • कोकणातील दीड वर्षाची चिमुकली बनली सर्वात लहान जलतरणपटू; 9 महिन्याची असतानापासून शिकली स्विमिंग
Top News

कोकणातील दीड वर्षाची चिमुकली बनली सर्वात लहान जलतरणपटू; 9 महिन्याची असतानापासून शिकली स्विमिंग

yongest girl who learn swiming at age of 9 month now she is most yongest swimmer

youngest swimmer from Konkan : असं म्हणतात की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता खरंच हे वाक्य खरं असं म्हणण्याची वेळ आली आहे. आणि ही वेळ आणली आहे, रत्नागिरीतील वेदा नावाच्या नऊ वर्षाच्या एक चिमूरडीने. कारण सर्वात लहान जलतरणपटू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद करण्यात आली आहे. खेळण्याच्या वयात तिने नवीन कला आत्मसात करून नवीन विक्रम बनवला आहे.

कोण आहे हि चिमुरडी

रत्नागिरी येथील वेदा परेश सरफरे ही चिमुरडी 9 महिन्याची असल्यापासून रत्नागिरीतील शासकीय जलतरण तलावात पोहते. आता तिने एवघ्या 1 वर्ष 9 महिन्याची असताना १०० मीटरचे अंतर १० मिनिटे आणि ८ सेंकदात पूर्ण करत इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद करण्यात आली आहे. ती भारतातील सर्वात छोटी जलतरणपटू बनली आहे. ती आता कोकणातील छोटीशी जलतरणपरी बनली आहे. जे मोठ्या व्यक्तींना देखील शिकायला वेळ लागतो ते या चिमुरडीने करून दाखवल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे ही वाचा : महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा -राज्य निवडणूक आयुक्त

सर्वात लहान जलतरण पटू

वेदा या चिमुरडीने 100 मीटरचे अंतर 10 मिनिट 8 सेकंदात पूर्ण केले असून तिने सर्वात लहान जलतरण पटू म्हणून नाव कमावले आहे. दीड वर्षाची हि चिमुरडी जिचं रडण्याचं वय असून ती रडणं विसरून पोहायला लागली. वेदाचा मोठा भाऊ हा शासकीय जलतरण तलावात रोज सरावासाठी येतो. त्याने राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.

तेव्हापासून लागली पोहण्याची आवड

वेदाची आई तिला आणि रूद्रला घेऊन शासकीय जलतरण तलावावर येत होती. त्यावेळी तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं बघायची. एकदा जेव्हा प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडता पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. आणि तेव्हापासून तिला पाण्यात पोहण्याची आवड लागली. आणि तिने तिच्या भावासोबत स्विमिंग शिकायला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts