Jayshree role in V Shantaram biopic : काही दिवसांपूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माता व्ही शांताराम यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तर या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटात जयश्री भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता जान्हवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचे पोस्टर समोर आले आहे. जाणून घ्या कोण साकारणार जयश्री ची भूमिका.
कोण साकारणार जयश्री
दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यावर आधारित बायोपिक मध्ये व्ही शांताराम यांच्या भूमिकेनंतर आता महत्वपूर्ण भूमिका म्हणजे जयश्री कोण साकारणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार असून चित्रपटातून सहकलाकारापासून ते पत्नी इथपर्यंतचा नाजूक, भावस्पर्शी प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज झाले असून यामध्ये जयश्री ची भूमिका साकारणार असणारी तमन्ना भाटिया गुलाबी साडीत दिसत आहे. तिचा पोस्टरमधील अत्यंत नाजूक असा अंदाज मन मोहून टाकत आहे.
जयश्री यांचे वैवाहिक जीवन
व्ही शांताराम यांनी 1941 मध्ये जयश्री यांच्या सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. जयश्री आणि व्ही शांताराम यांना तीन अपत्य होती. त्यापैकी 1 मुलगा किरण शांताराम, जो आता दिग्दर्शक आणि निर्माता आहे. तर राजश्री आणि जयश्री या त्यांच्या मुली अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. 1956 मध्ये व्ही शांताराम आणि जयश्री यांचा घटस्फोट झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहापूर्वी त्यांनी सहचारिणी म्हणून व्ही शांताराम यांना दिलेली साथ त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ या सर्व रेखाटले जाणार आहे.
The star of an era ✨
The strength behind a legacy 🎞️
A chapter returning to history. 🌟@SiddyChats #SubhashKale @unbollywood @rajkamalent @SaritaTanwar #VShantaram #TheRebelOfIndianCinema pic.twitter.com/YtEdBiSAGr— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) December 9, 2025
काय म्हणाले निर्माते
जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली असून तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपूर्ण शालीनता, नैसर्गिक चमक आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतील. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून, या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असं वाटतं.” असे मत निर्माता यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा : बिगबॉस 19 ची ट्रॉफी जिंकणारा गौरव खन्ना आहे तरी कोण? जाणून घ्या जिंकलेली किती रक्कम घरी घेऊन जाणार
केव्हा होणार प्रदर्शित
हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित आहे. तर या चित्रपटाचे निर्माते राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.












