Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • 2025 संपण्यापूर्वी हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय ? मग याठिकाणी जाण्याचा प्लॅन नक्कीच करा
लाईफस्टाईल

2025 संपण्यापूर्वी हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय ? मग याठिकाणी जाण्याचा प्लॅन नक्कीच करा

Scenic view of snow-capped mountains and valleys in Kashmir, showcasing its beauty as a winter travel destination

Winter travel destination 2025 : तुम्ही मागील वर्षी फिरायला जाण्याचा प्लॅन आखला असेल. किंवा तुम्ही 2024 संपल्यावर 2025 साठी एक बँकेत लिस्ट तयार केली असेल. या बकेट लिस्टमध्ये तुम्ही 2025 मध्ये नक्कीच फिरायला जाईल असे देखील लिहिला असेल. हो ना..? परंतू पुन्हा तेच ते रुटीन, बिझी शेड्युल यामुळे फिरायला जाण्याचा चान्सच भेटला नसेल. पण आता 2025 मधील शेवटच्या आठवड्यात तुम्ही तुमची हि बकेटलीस्ट मधील ट्रॅव्हलिंग हे स्वप्न पूर्ण करू शकतात. अजून किमान 20-21 दिवस तरी हे वर्ष संपायला बाकी आहे. आमी या 20-21 दिवसात तुम्ही छोटीशी ट्रिप प्लॅन करून 2025 मधील एक इच्छा पूर्ण करू शकतात.

आजच्या या लेखात आपण भारतातील टॉप 5 पाच टुरिस्ट डेस्टिनेशन पाहणार आहे. जिथे तुम्ही जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. हिवाळ्यात अनेक जण निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. तुम्हीही तो प्लॅन नक्कीच केला असेल. तर चला मग जाणून घेऊया हे 5 स्पेशल ठिकाणे जिथे तुम्ही जाऊ शकतात.

1 राजस्थान

अद्वितीय संस्कृती, राजेशाही थाटात नटलेले राजस्थान खरंच पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. राजस्थान येथील जयपूर, उदयपूर, जैसलमेर यासारखी शहरांना तुम्ही भेट देऊ शकतात. येथील किल्ले, राजवाडे आणि तलाव सर्वांना मोहून टाकतात. पुष्कर, अजमेर, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, चित्तोडगड, बिकानेर आणि कोटा ही ठिकाणे वर्षअखेरीस येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत इच्छित ठिकाणे आहेत. राजस्थानच्या स्थानिक कला, हस्तकला आणि पाककृती देखील या ठिकाणाला अद्वितीय बनवतात.

राजस्थानातील जयपूर हे पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. याठिकाणी तुम्ही हवा महाल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस, जंतर मंतर , जोहरी बाजार याठिकाणी भेट देऊ शकतात. तर उदयपूर येथे सिटी पॅलेस, पिछोला लेक, फतेहसागर लेक , सहेलियों कि बाडी याठिकाणी तुम्ही फिरू शकतात. उदयपुरला लेक सिटी म्हंटले जाते. राजस्थानातील मेहरानगर किल्ला , जसवंत थडा, उम्मेद भवन तर जेसलमे या गोल्डन सिटी मध्ये फिरण्यासाठी जैसलमेर किल्ला, सॅम सँड ड्यून्स आणि पटवों की हवेली याठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात.

2 काश्मीर

काश्मीर येथे फिरायला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे पर्यटकांचे स्वर्ग म्हणून ओळखले जाते. काश्मीर हे पर्यटनस्थळ अनेकांना भोवते. काश्मीर येथील श्रीनगर येथे डल लेक शिकारा रायड , मुगल गार्डन्स , हजरतबल दरगाह, शंकराचार्य टेकडी हे स्थळ पाहण्यासारखे आहेत. याशिवाय गुलमर्गगोंडोला राइड , स्कीइंग, आफारवात पीक दृश्य याठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकतात. तर सोनमर्ग येथे थजीवास ग्लेशियर किंवा स्नोफ़ॉल तुम्ही याठिकाणी पाहू शकतात. तुम्ही श्रीनगर येथे जाऊन दल सरोवर, मुघल गार्डन, गुलमर्ग या स्थळांना भेट देऊ शकतात.

हे ही वाचा : हिवाळ्यात ‘ही’ फळे खाल्ली तर नक्की आजारी पडाल; जाणून घ्या कारणे

3 प्रयागराज

उत्तर प्रदेशातील प्रयागराज यावर्षी झालेल्या महाकुंभमेळ्यामुळे चर्चेत होते. याठिकाणी तुम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आणि तेथील घाट आध्यात्मिक अनुभव घेऊ शकतात. प्रयागराज हे वाराणसी जवळ आहे. म्हणजे तुम्ही त्याठिकाणी जाऊन घाट, स्ट्रीट फूड आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद देखील घेऊ शकतात.

5. मेघालय

मेघालय जाऊन तेथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मेघालयाचे नैसर्गिक सौंदर्य, पाऊस आणि अद्वितीय आदिवासी संस्कृती तुम्ही अनुभवू शकतात. तेथील चेरापुंजीचे धबधबे, डावकीची हिरवळ आणि मावलिनॉन्गचे स्वच्छ रस्ते फिरण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. तुम्ही मेघालय येथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर पर्वतीय दृश्ये, नद्या आणि हिरवागार परिसर तुम्हाला एक अनोखा अनुभव देईल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना साजूक तूप: आरोग्याचं अमृत, रोजच्या आहारातली सुवर्णकिल्ली!