Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘ती’ गोळी खाल्ली अन् १६ वर्षाचा मुलगा हैवान झाला, ५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला
गुन्हा

‘ती’ गोळी खाल्ली अन् १६ वर्षाचा मुलगा हैवान झाला, ५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला

Child Sexual Abuse
91

Sexual assault on 5-year-old girl : राज्यात सध्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच अशा घटना पुन्हा पुन्हा घटत आहेत. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेल्या १६ वर्षीय मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. घरात बोलावल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी पाहिले असता, चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यानंतर पीडितेला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – नातेपुते स्मशानभूमीत काळ्या बाहुल्या, फोटो, लिंबू, सुया नारळ मध्यरात्री चितेवर अघोरी प्रकार

गोळ्या खाली आणि बुद्धीचा ताबा सुटला..

या घटनेनंतर, पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो सांगतो की, त्याने एक गोळी खाल्लेली होती. त्या गोळीचा परिणाम झाल्यामुळे त्याचे डोके जड झाले आणि त्याला काही सुचले नाही. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. कांदिवली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे लालजी पाडा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त स्थानिक नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. ‘अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यास समाजात जरब बसेल,’ अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts