Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सर्वांचा विमा सर्वांची सुरक्षा नावाने नवीन विमा सुधारणा बिल 2025 ला मंजुरी; ग्राहकांना होणार हा फायदा
बिजनेस

सर्वांचा विमा सर्वांची सुरक्षा नावाने नवीन विमा सुधारणा बिल 2025 ला मंजुरी; ग्राहकांना होणार हा फायदा

Parliament approves Insurance Reform Bill 2025 aimed at insurance coverage for all citizens

Insurance Reform Bill 2025 : आता लवकरच विमा क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. केंद्र सरकारने विमा क्षेत्रात मोठा फेरबदल केला आहे. या बदलानुसार सर्वांचा विमा सर्वांची सुरक्षा नावाने नवीन विमा सुधारणा बिल 2025 सादर करण्यात आले आहे. या विमा सुधारणा बिल ला मंजुरी मिळाली असून 100 टक्के FDI ला आता मंजुरी मिळाली हे.

विमा क्षेत्रामध्ये व्यापक बदल घडवण्यासाठी आणि त्याचा परीघ वाढवण्यासाठी सरकारने परदेशी गुंतवणुकीला हिरवा झेंडा दाखवला आहे. विमा क्षेत्रातील हा मोठा बदल असणार आहे. या नवीन बील मध्ये LIC ला मोठा फटका बसणार आहे. त्यानुसार LIC साठी स्वतंत्र आणि IRDAI साठी जास्तीत जास्त अधिकार देण्यात आहे आहे. त्यानुसार जुन्या बिल मध्ये काही बदल देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : NPS नियमांत बदल, गुंतवणुकदारांसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या गोष्टी

परदेशी गुंतवणुकीसाठी मोठे पाऊ

मंजूर झालेल्या नवीन विमा सुधारणा बिल 2025 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्यानुसार विमा कायदा 1938 , LIC कायदा 1956 आणि IRDAI कायदा 1999 या सर्वांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. यामुळे विमा क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना अनेक योजना देखील यामुळे मिळतील. हे नवीन बिल परदेशी गुंतवणुकीसाठी आणि नियमनासाठी मोठे पाऊ ठरेल अशी आशा आहे. यासोबतच सरकारने परदेशी गुंतवणूक 74 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून 100 टक्के एवढी केली आहे. म्हणजे आता परदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल.

ग्राहकांना काय फायदा होणार

नवीन विमा कायद्यामुळे आता या क्षेत्रात स्पर्धा वाढेल. आणि ग्राहकांना अप्रतिम योजनांचा लाभ मिळेल. तर विमा पॉलिसी आता आणखीनच स्वस्त होणार आहे. या कायद्याअंतर्गत जीवन विमा महामंडळांना मोठा फायदा होणार आहे. तर LIC ला देखील अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे. जीवन विमा महामंडळांना आता पॉलिसी तयार करून बाजार आणण्यास वेळ लागणार नसल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय सरकारच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts