Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

राज्यातील दिग्गजांचे पराभव जाणून घ्या.. एका क्लिकवर

State Veterans Defeat

Defeat of state stalwarts : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभव पत्करावा लागला, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी भाजपला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

साताऱ्यात रामराजे निंबाळकरांना धक्का

सातारच्या फलटनमध्ये रामराजे निंबाळकर यांच्या ३० वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागलाय. रामराजेंचे सुपूत्र अनिकेत निंबाळकर ६०० मतांनी पराभूत झाले. भाजपचे माझी खासदार रणजितसिंह नाकई निंबाळकर यांचे बंधु समशेरसिंह निंबाळकर हे विजयी झाले. २७ पैकी १६ जागांवर भाजपचे कमळ फुललं आहे.

भाजपचे धारुरमध्ये सर्वच उमेदवार क्लिनबोल्ड

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बीडच्या धारूर मध्ये भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. हा विजय पंकजा मुंडेंसाठी धक्का तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसाठी वर्चस्वाचा ठरला आहे. १७ च्या १७ जागांवर भाजपची पिछेहाट झाली.

ऐनवेळी संधी अन् राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाली

कोकणात भाजपच्या उमेदवाराला धूळ

कोकणातल्या मालवण आणि कणकवली येथे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री नितेश राणे यांना धक्का दिला. मालवण मध्ये शिंदे सेनेच्या ममता वराडकर यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. तर कणकवलीमध्ये देखील स्थानिक शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी देखील भाजपच्या उमेदवाराच्या चारी मुंड्या चित केल्या.

श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांना धक्का

श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे व त्यांच्या कन्या मंत्री अदिती तटकरे यांना धक्का बसला आहे.. तेथे उध्दव ठाकरे सेनेचे अतुल चोगले विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र सातनाक यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. श्रीवर्धन हा आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदार संघ आहे.

शिरोळात आमदार अशोक माने यांच्या सुनबाईचा दारुण पराभव

शिरोळ नगरपरिषदेवर यादव आघाडीने सत्ता मिळवत नगराध्यक्ष पदासह तब्बल १५ नगरसेवक विजयी केले आहेत. या निकालामुळे आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाईंचा दारुण पराभव झाला असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची शिरोळवरील सत्ता पूर्णतः संपुष्टात आली आहे.

धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वर्चस्वाला धक्का

धाराशिव जिल्ह्यातील ८ नगरपरिषदांपैकी ठाकरेंच्या सेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जातोय. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, कळंब, परंडा आणि भूम या चार ठिकाणी शिंदे सेनेने वर्चस्व राखलं. तर तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम आणि धाराशीव पालिकेत भाजपचा झेंडा फडकला. लोकसभेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात ठाकरेंची सेना निवडणूक लढवत होती. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र निराशा हाती आल्याचे पाहायला मिळाले.

एकाच घरातील ६ जणांना तिकिट, सर्वांचा दारूण पराभव

नांदेड जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे, घराणेशाहीवरुन काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजपाच्या भूमिकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वाना उमेदवारी दिली होती. मात्र, जनतेनं या सर्वांना नाकारले असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दाखवून दिलं. भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती. इथे नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts