• Home
  • राजकारण
  • आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज भरणार उमेदवारी अर्ज; लढवणार महापालिका निवडणूक
Top News

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज भरणार उमेदवारी अर्ज; लढवणार महापालिका निवडणूक

Andekar gang leader Bandu Andekar arriving to file his nomination for the municipal elections

Bandu Andekar municipal election : सध्या महापालिका निवडणुकांची तयारी सर्वत्र सुरु आहे. अशातच आता नामनिर्देशित पत्रे भरण्यासाठी इच्छुक उमेदवार गर्दी करत असून पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहे.

पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येईल. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. काही वेळात बंडू आंदेकर याला अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात येणार आहे. त्यापूर्वी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात बंडू आंदेकर यांनी आयुष्य कोमकर याची हत्या केली होती. त्यानंतर बंडू आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. आता बंडू आंदेकर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी आंदेकर यांना सत्र न्यायालयाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोणत्याही प्रकारची मिरवणूक, प्रचार यात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषण करण्यास न्यायालयाने बंदी घालत ताकीद दिली आहे.

हे ही वाचा : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? नाराजी नाट्य सुरु

काय म्हणाले न्यायालय

वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सुद्धा न्यायालयास महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. निवडणूक लढवण्यासाठी पुण्याच्या मोक्का न्यायालयाने सुद्धा परवानगी दिली. कोठडीत असून देखील निवडणूक लढवण्यास परवानगी मिळावी अशी वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांची इच्छा होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला. आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी केली. आणि वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर याना महापालिका निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts