• Home
  • राजकारण
  • मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात
Mumbai

मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात

Shiv Sena leaders trying to pacify rebels after 90 seat announcement in Mumbai

Shiv Sena Mumbai seat distribution : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेला 90 जागा मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून 90 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी 35 जणांनी नाराज होत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

काल झाली होती बैठक

काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी काल रात्री महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, राम रेपाळे, संजय मोरे असे ठाण्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने कोणाचे अर्ज मागे घ्यायचे आणि कोणाचे ठेवायचे यावर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

नाराज अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न

मुंबईत शिवसेनेत बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी मोठी असल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी भरल्याची सूत्रांची माहिती आहे. या नाराज अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षतील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

हे ही वाचा : भाजपच्या ट्रोलिंगला बळी पडून पूजा मोरे यांनी उमेदवारी घेतली मागे; अश्रू अनावर

संपर्क साधण्याचा प्रयत्न

मंत्री उदय सामंत, खासदार रविंद्र वायकर, राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जात आहे, अशी माहिती आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात शिवसेना नेत्यांना यश येतय का हे पाहणं महत्वाचं आहे.

अनेक प्रभागांमध्ये १ ते २ अपक्ष उमेदवार, या अपक्षांनी अर्ज मागे घेतल्यास त्या जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची शक्यता असून बिनविरोध निवडून येण्यासाठी काय रणनीती आखता येईल यासाठी खलबत या बैठकीत सुरु होती. अनेक नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना धोका आहे त्यामुळे पक्षातच बंड केलेल्या अपक्ष उमेदवारांचे बंड थंड करण्यासाठी काय केले जाऊ शकते यावर काल चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts