Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निवडणूक मतदान प्रक्रिया आधीच शिंदे सेना-भाजपची विजयी घोडदौड
Top News

निवडणूक मतदान प्रक्रिया आधीच शिंदे सेना-भाजपची विजयी घोडदौड

Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar

Shinde Sena BJP municipal election lead  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या आधीच भाजप-शिंदे सेनेने अनेक ठिकाणी विजय संपादन केला आहे. त्यांची ही विजयी घोडदौड अशीच सुरू आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत कुठे किती आणि कोणाचे उमेदवार निवडून आहेत त्याचे चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान, या निवडणुकीत पहिला विजय भाजपला कल्याण-डोबिंवली महापालिकेत मिळवता आलाय. त्यानंतर एक-दोन नाही तर तब्बल ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. डोंबिवलीत भाजपचा ७ चा विजय हा प्रभाग क्रमांक २७ ड मधील महेश पाटील या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत हे महेश पाटील यांच्या विरोधात लढत होते. मात्र, आज मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील यांनी बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपसोबत हातमिळवणी तर केली नाही ना? अशा चर्चा सध्या मतदार संघात रंगत आहेत.

हेही वाचा – मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात

२२ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाची औपचारीकता बाकी

राज्यातील महापालिका निवडणुकीत आतापर्यंत एकूण २२ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपच्या ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने ९ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यातील ८ महापालिकेत एकूण २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मालेगावची १ जागा सोडली तर २१ उमेदवार हे महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत.

भाजपचे सर्वाधिक १२ उमेदवार बिनविरोध तर शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजेच १२ उमेदवार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे. तर, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे, एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहे. दरम्यान, अद्यापही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत सर्व अपडेट आलेल्या नाहीत. त्यामुळे उद्या आणखी काही वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ८ महापालिकेतील २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत

सर्वाधिक कल्याण- डोंबिवलीत एकूण १२ उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत

– कल्याण-डोंबिवली – प्रभाग १८ मधून रेखा चौधरी (भाजप)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ क मधून आसावरी नवरे(भाजप)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ ब रंजना पेणकर -(भाजप)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून ज्योती पाटील (भाजप)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून मंदा पाटील (भाजप)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून रमेश म्हात्रे (शिंदेंची शिवसेना)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून विश्वनाथ राणे (शिंदेंची शिवसेना)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून वृषाली जोशी (शिंदेंची शिवसेना)
– कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून हर्षल राजेश मोर (शिंदेंची शिवसेना)

धुळ्यात ३ उमेदवार बिनविरोध

– धुळे – प्रभाग १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
– धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
– धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले

दोन महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे ७ बिनविरोध

– जळगाव – प्रभाग १८ अ मधून गौरव सोनवणे (शिंदेंची शिवसेना)
– जळगाव – प्रभाग क्रमांक 9 अ मधून मनोज चौधरी बिनविरोध (शिंदेंची शिवसेना)
– जळगाव – प्रभाग 9 ब मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध (शिंदेंची शिवसेना)

अहिल्यानगरमध्ये अजित पवाराचे दोन बिनविरोध

– अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
– अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक 14 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे

पनवेल, भिवंडी, जळगाव, पिंपरी-चिंचवड आणि मालेगावत प्रत्येकी एक-एक उमेदवार बिनविरोध

– पनवेल – प्रभाग १८ ब मधून नितिन पाटील (भाजप)
– भिवंडी – प्रभाग १७ अ मधून सुमित पाटील (भाजप)
– जळगाव – प्रभाग १२ ब मधून उज्ज्वला बेंडाळे (भाजप)
– पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी प्रभाग ६ मधून रवि लांडगे बिनविरोध (भाजप)
– मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts