Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हिमाचल प्रदेशातील सिरमौरमध्ये खाजगी बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
ताज्या बातम्या

हिमाचल प्रदेशातील सिरमौरमध्ये खाजगी बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Accident in Himachal Pradesh

Accident in Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी एक खाजगी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळं घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.

अपघातात बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान :

प्राप्त माहितीनुसार ही खाजगी बस शिमलाहून कुपवीला जात होती. सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी विधानसभा मतदारसंघातील हरिपूरधार इथं ही बस रस्त्यानं घसरुन दरीत पडल्याचं वृत्त आहे. हरिपूरधार बाजारपेठेसमोर ही बस दरीत कोसळली. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याचं वृत्त आहे. अपघातामुळं बसचं मोठं नुकासन झालं. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली, मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (Accident in Himachal Pradesh) :

सिरमौरचे पोलीस अधीक्षक निश्चिंत सिंह नेगी म्हणाले, “कुपवीहून शिमलाला जाणारी एक खाजगी बस सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधारजवळ रस्त्यावरुन घसरल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो. बसमध्ये 30-35 लोक होते आणि अधिक माहितीची वाट पाहत आहे. मी घटनास्थळी जात आहे. पोलीस आणि इतर बचाव पथके जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts