• Home
  • मनोरंजन
  • oscar 2026 : कांतारा चॅप्टर 1 आणि महावतार नरसिम्हा चित्रपटांची ऑस्करच्या शर्यतीत झेप
मनोरंजन

oscar 2026 : कांतारा चॅप्टर 1 आणि महावतार नरसिम्हा चित्रपटांची ऑस्करच्या शर्यतीत झेप

Kantara Chapter 1 and Mahavatar Narasimha films enter Oscar 2026 race

Oscar 2026 Indian films : भारतीय सिनेसृष्टी झेप घेत आहे. आता हॉम्बले या प्रसिद्ध निर्मीती संस्थाच्या दोन चित्रपटांनी ऑस्कर 2026 च्या शर्यतीत आपले स्थान मिळवले आहे. ऋषभ शेट्टी यांचा कांतारा चॅप्टर 1 आणि महावतार नरसिम्हा, अनुपम खेर दिग्दर्शित तन्वी ग्रेट या चित्रपटांनी जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली आहे. हे चित्रपट बेस्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरला आहे.

ऑस्कर 2026 साठी कांतारा 1 आणि महावतार नरसिम्हा, अनुपम खेर दिग्दर्शित तन्वी ग्रेट या चित्रपटांना जनरल एन्ट्री लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. या चित्रपटांना विविध महत्वाच्या पुरस्कार श्रेणीसाठी विचारात घेण्यात आले असून अनेक महत्वाच्या पुरस्कारांसाठी या चित्रपटांचे नाव प्राधान्याने घेण्यात आले आहे.

यामध्ये मुख्यत्वे सर्वोत्कृष्ट अभिनेताअभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथालेखन, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन आणि सिनेमॅटोग्राफी या श्रेणींमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आले असून अंतिम निर्णय आता अकादमीच्या वतीने घेण्यात आला आहे. याशिवाय हा चित्रपट बेस्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरला आहे.

हे ही वाचा : यशच्या जन्मदिनाच्या दिवशी Toxic चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; यशचा नवीन अवतार वेधून घेतोय लक्ष

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्सेस यांनी 201 चित्रपटांची यादी जाहीर केली असून या चित्रपटात दोन्ही भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी अटींशिवाय अतिरिक्त पात्रता निकष आणि आता पूर्ण करत जागतिक स्तरावर ऑस्करच्या शर्यतीमध्ये आपले स्थान पटकावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts