Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • यशच्या जन्मदिनाच्या दिवशी Toxic चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; यशचा नवीन अवतार वेधून घेतोय लक्ष
मनोरंजन

यशच्या जन्मदिनाच्या दिवशी Toxic चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; यशचा नवीन अवतार वेधून घेतोय लक्ष

Yash’s new avatar revealed in Toxic movie teaser released on his birthday

Yash Toxic teaser : वाढदिवसाच्या दिवशी सुपरस्टार यशने चाहत्यांना एक खास गिफ्ट दिले आहे. त्याच्या आगामी Toxic A Fairy Tale For Grown Ups या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. या टिझरमध्ये यश नवीन अवतारात दिसत आहे. त्याचा अवतार पाहून चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची ओढ लागली आहे.

तरण आदर्श पोस्ट

प्रसिद्ध बॉलिवूड ट्रे विश्लेषक तरण आदर्श यांनी Toxic चित्रपटाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी अभिनेता यशच्या नवीन अवताराचे कौतुक केले असून KGF 2 नंतर यशचा हा मोठा चित्रपट असल्याचे त्यांनी पोस्ट मध्ये नमूद केले. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘यशच्या वाढदिवसाचे औचित्य साधत Toxic चित्रपटाच्या टीमने मोठा धमाका केला आहे. Toxic चित्रपटातील Raya या पत्रामध्येचा पॉवर पॅक्ड अवतार अधिकृतपणे समोर आला.’

या दिवशी होणार प्रदर्शित

कन्नड अभिनेता यश KGF-2 चित्रपटानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकायला तयार आहे. Toxic A Fairy Tale For Grown Ups हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या Get a good at your danger या टॅगलाईसह या चित्रपटाची थीम अजूनच गुढ आणि थरारक दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी इंग्रजी, कन्नड भाषेत चित्रित करण्यात आला असून तेलगू, तामिळ, मल्याळम यास इतर भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिगबॉस मराठी सिझन 6; 21 ते 55 वयोगटातील सदस्य होणार सहभागी

तगडी स्टारकास्ट

toxic या चित्रपटात अभिनेता यश सोबत नयनतारा, हुमा कुरेशी, कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि रुख्मिणी वसंत ही तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला असून यश आणि गीतू मोहनदास यांनी संयुक्तरित्या कथा, पटकथा लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती KVN Production आणि Monster Creations यांनी केली. तर चित्रपटाचे संगीत रवी बांसुर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts