• Home
  • मनोरंजन
  • बॉर्डर 2 चित्रपटाने तीन दिवसात केली 193.48 कोटी रुपयांची कमाई; तिन्ही दिवस हाऊसफुल
मनोरंजन

बॉर्डर 2 चित्रपटाने तीन दिवसात केली 193.48 कोटी रुपयांची कमाई; तिन्ही दिवस हाऊसफुल

border 2 collection

Border 2 Box Office Collection :  मनोरंजन विश्वात बॉर्डर 2 चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 23 जानेवारी रोजी बॉर्डर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वी प्री तिकीट बुकिंग सेल म्हणजेच ऍडव्हान्स तिकीट बुकिंगच्या माध्यमातून आकर्षक कमाई केली. त्यानंतर चित्रपटाने 4 दिवसात खास करून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अप्रतिम कमाई केली.

1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर चित्रपटानंतर त्याचा सिक्वेल 23 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कहाणी 1971 च्या भारत आणि पाकिस्थान युद्धातील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्र येऊन कशा पद्धतीने युद्धाची तयारी करतात. हे प्रभावीपणे दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटातील पात्र त्यांनी साकारलेली भूमिका संगीत, कथानक सर्वकाही मनाला भिडणारे असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चित्रपटाने आकर्षक कमाई केली.

लॉन्ग विकेंडचा फायदा

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शनिवार रविवार आणि 26 जानेवारी असे तीन दिवस मिळून सुट्टी आल्यामुळे चित्रपटाला चांगला फायदा झाला. चित्रपटगृहातुन प्रेक्षक बाहेर आले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ही कहाणी होती. या चित्रपटाने अप्रतिम कमाई केली असून ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील चित्रपटाच्या कमाई बद्दल सांगितले आहे.

बॉर्डर 2 तीन दिवस हाऊसफुल

बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ट्रेड विश्लेषक रण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या मते बॉर्डर 2 चित्रपटाने शुक्रवारी प्रीतिकीट बुकींच्या माध्यमातून अप्रतिम कमाई केली. या चित्रपटासाठी रविवारी आणि सोमवा हे सर्वात मोठे दिवस ठरले. सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने चित्रपटाला जबरदस्त फायदा झाला. तर सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांचे तोंड देखील बॉक्स ऑफिसच्या यशाने पूर्णपणे बंद केले. संपूर्ण सिनेमागृह बॉर्डर 2 चित्रपटाने व्याप हाऊसफुल केले होते.

हे ही वाचायश, परी, नेहा हे त्रिकुट पुन्हा एकदा येणार एकत्र; आगामी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

193.48 कोटी रुपयांची कमाई

शुक्रवारी बॉर्डर 2 चित्रपटाने 32.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर शनिवार 40.59 कोटी, रविवारी 57.20 कोटी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 63.59 कोटी रुपयांची अशी एकूण 193.48 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली. चित्रपटाची ही दमदार सुरुवात पाहता हा चित्रपट लवकरच सर्व विक्रम प्रथापित करेल असा अंदाज ट्रेड विश्लेषक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

घर कब आओगेनव्याने संगीतबद्ध

बॉर्डर या गाजलेल्या चित्रपटाची परंपरा दिग्दर्शकांनी सुंदररित्या पुढे नेली आहे. या चित्रपटात शौर्य, त्याग आणि सैनिकांमधील मैत्री प्रभावीरीत्या दर्शवण्यात ली आहे. चित्रपटात स्फोट, रणनिती, जमीन आणि हवाई लढाई प्रभावीरीत्या दाखवण्यात आल्या आहे. या चित्रपटातील संवाद खूप प्रभावी आणि देशभक्तीने भरलेला आहे. चित्रपटातील संगीत खूपच सुंदर आहे. जुन्या बॉर्डर चित्रपटातीलघर कब आओगेआणिजाते हुए म्होहे दोन गाणे नव्याने संगीतबद्ध करण्यात आले आहे.

संवाद आणि अभिनय प्रेक्षकांना भारावून टाकतात

बॉर्डर चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचा तो मुख्य आधार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रभावी वाटतो. यासह दमदार संवाद आणि अभिनय प्रेक्षकांना भारावून टाकतात. या चित्रपटात वरुण धवनने चांगला अभिनय केला आहे. त्याची भूमिका देखील भावनिक आणि ताकदीची आहे. एवढेच नाही तर दिलजीत दोसांजचा अभिनय देखील समाधानकारक वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts