Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • द राजा साब चित्रपट न कॉमेडी ना भयावह; जाणून घ्या चित्रपटाची 4 दिवसांची कमाई
मनोरंजन

द राजा साब चित्रपट न कॉमेडी ना भयावह; जाणून घ्या चित्रपटाची 4 दिवसांची कमाई

The Raja Saab movie box office collection after four days

The Raja Saab box office collection : नुकताच साऊथ सुपरस्टार प्रभासचा राजा साबहा चित्रपट नुकताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असून बॉक्स ऑफिसवर देखील या हॉरर कॉमेडीची चांगलीच चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे. हा चित्रपट हॉरर, फँटसी , कॉमेडी आणि ड्रामा यांचा अनोखा संगम बघायला मिळत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा

‘द राजा साब’ या चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा-पटकथा ही हॉरर सह कॉमेडी अंदाजात दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजे राजू एक बिनधास्त राहणारा तरुण आहे, हा तरुण त्याच्या आजीसोबत साधे जीवन जगतो. परंतु त्याचे हे सर्वसाधारण जग हे एका शाही इतिहासाशी जोडल्या गेले आहे. राजूची आजी एका संस्थानाची मालकीण होती. परंतु विश्वासघात आणि परिस्थितीमुळे सर्व काही त्यांच्याकडून हिरावले गेले होते. तर राजुचे आजोबानक राजू हे रहस्यमयीरित्या हरवले होते. एकेदिवशी राजू ची आजी आजोबांना शोधण्यास सांगतेयाच सीन पासून राजुचा गायब आजोबांना शोधण्याचा प्रवास सुरु होतो.या चित्रपटात तो त्याच्या आजोबाचा शोध घेताना होणारी चुकामुक, त्याला उमगलेले कोडे, प्रेत आत्म्यांचे रहस्य ? राजुला त्याचे आजोबा सापडतील का ? हे सर्व आपल्याला चित्रपटगृहात बघावे लागेल.

कलाकारांचा भिनय

राजा साब चित्रपटात राजुच्या भूमिकेत असलेला प्रभास त्याच्या पात्रात पूर्णपणे शिरलेला दिसून येतो. खासकरून कॉमेडी आणि इमोशनल सिन मध्ये त्याने अप्रतिम टाईमिंग साधला आहे. तर राजुच्या आजोबांच्या भूमिकेत असलेला संजय दत्त यांचे पात्र देखील अप्रतिम आहे. त्यांचे पात्र एक रहस्यमयी भाग असून चित्रपटात त्यांचा वजनदार आवाज, भयानक अंदाज आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेंन्स दिसून येतो.

कशी आहे चित्रपटातील कथा

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर कहाणी ही खूपच गोधळणारी वाटत असून चित्रपटातील एखादे पात्र आणि त्याचा सिन सोबत असलेला संबं लवकर स्पष्ट होत नाही. चित्रपटातील एकापाठोपाठ येणारे सिन हे कथेला पूर्ण करत नसल्याचे जाणवते. चित्रपटाला हॉरर कोमेडी असल्याची उपमा देण्यात आलेली असली तरीही हा चित्रपट भयावह नाही. आणि कॉमेडी देखील नाही.

हे ही वाचा : ‘माया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीच चित्रपटाने घेतली झेप; 24 व्या PIFF मध्ये झाली निवड

किती आहे 4 दिवसांची आकडेवारी

सॅकनिक वेबसाइटनुसार, राजा साब या चित्रपटाने पहिल्या 3 दिवसात उत्तम कामगिरी केली असून चित्रपटाने भारतात अवघ्या 4 दिवसात 110.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये मिळून सुमारे 2.78 कोटींची कमाई केली. ही आकडेवारी लाईव्ह असून अंतिम आकडेवारी रात्री 10 वाजेपर्यंत समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts