Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होईल’; ओवेसींच्या विधानावरुन भाजपा, काँग्रेसची टीका
Top News

‘एक दिवस हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होईल’; ओवेसींच्या विधानावरुन भाजपा, काँग्रेसची टीका

Owaisi Statement

 

Owaisi Statement : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या विधानामुळं राजकीय गोंधळ उडाला आहे. सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. उत्तर प्रदेशचे प्रभारी भाजपाचे मंत्री दिनेश सिंह यांनी म्हटलं आहे की हे फक्त स्वप्न असू शकते. दिवास्वप्न पाहणं वाईट नाही. स्वप्न पाहण्याच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता नाही. जर कोणी स्वप्न पाहिलं तर आम्हाला कोणताही आक्षेप नाही.

काय म्हणाले होते ओवैसी :

ओवैसी यांनी सोलापूरमध्ये एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल. ओवैसी यांनी संविधानात नमूद केलेल्या सर्व नागरिकांच्या समानतेचा उल्लेख केला. ओवैसी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेची तुलनाही केली. ते म्हणाले की पाकिस्तानमध्ये फक्त एकाच धर्माची व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, तर भारतात असं नाही. आपल्या देशात कोणताही नागरिक, मग तो कोणताही धर्म असो किंवा समुदाय असो, पंतप्रधान होऊ शकतो. ओवैसी म्हणाले की ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. हे संविधानाचं सौंदर्य आहे.

इम्रान मसूद यांनी उपस्थित केले प्रश्न :

ओवेसींच्या विधानाबाबत काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले की, ते (ओवेसी) अशक्य गोष्टी बोलत आहेत. हे दिवसा तारे पाहण्यासारखं आहे. ते अशक्य गोष्टी का बोलत आहेत? लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत. हिजाब घालणं किंवा न घालणं ही वैयक्तिक बाब आहे. ओवेसींच्या टिप्पणीला उत्तर देताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, त्यांनी (ओवेसी) प्रथम पसमंडा किंवा हिजाब घातलेल्या महिलेला त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त करावं. शहजाद यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं की, “मियां ओवेसी म्हणतात की हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होईल. संविधान कोणालाही रोखत नाही, परंतु मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्ही प्रथम पसमंडा किंवा हिजाब घातलेल्या महिलेला तुमच्या एआयएमआयएमच्या अध्यक्षपदी नियुक्त करा.”

ओवेसींनी आणखी काय म्हटलं? :

महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी करणारे ओवेसी म्हणाले की, भारतीय संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देते. आपलं संविधान कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानत नाही. इथं सर्वजण समान आहेत आणि हेच लोकशाहीचं खरं सार आहे. त्यांनी त्यांचे संवैधानिक अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालं पाहिजे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts