Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर अखेर बाजारात तेजी; सेन्सेक्स 302 तर निफ्टी 107 अंकांनी वधारला
ताज्या बातम्या

सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर अखेर बाजारात तेजी; सेन्सेक्स 302 तर निफ्टी 107 अंकांनी वधारला

Share Market Closing

Share Market Closing Today : शेअर बाजारातील पाच दिवसांची घसरण अखेर आज थांबली. सकाळी लक्षणीय घसरणीसह उघडल्यानंतर आज देशांतर्गत शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सोमवारी, बीएसई सेन्सेक्स 301.93 अंकांनी (0.36%) वाढून 83,878.17 वर बंद झाला. एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 106.95 अंकांनी (0.42%) वाढून 25,790.25 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात बाजार पाचही सत्रांमध्ये तोट्यासह बंद झाला होता हे लक्षात घेण्यासारखं आहे.

टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी सुरुच :

सोमवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित पाच समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी 50 मधील 50 पैकी 39 कंपन्यांचे शेअर वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 11 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलचा शेअर सर्वाधिक 2.75 टक्के वाढीसह बंद झाला, तर इन्फोसिसचा शेअर सर्वाधिक 1.16 टक्के तोटासह बंद झाला.

सेन्सेक्समधील इतर कंपन्यांचे शेअर्स आज कसे राहिले? :

सेन्सेक्समधील उर्वरित समभागांमध्ये, एशियन पेंट्स 2.54 टक्के, ट्रेंट 2.05 टक्के, एसबीआय 1.51 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.36 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.26 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.14 टक्के, भारती एअरटेल 0.87 टक्के, टीसीएस 0.86 टक्के, टायटन 0.68 टक्के, मारुती सुझुकी 0.65 टक्के, अदानी पोर्ट्स 0.57 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.54 टक्के, एनटीपीसी 0.46 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.39 टक्के, आयटीसी 0.३७ टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.37 टक्के, एचसीएल टेक 0.35 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३४ टक्के, इटरनल ०.३० टक्के, सन फार्मा ०.२६ टक्के, टेक महिंद्रा ०.२४ टक्के, इंडिगो 0.19 टक्के आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे पॉवर ग्रिडचे शेअर्स 0.18 टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, सोमवारी बजाज फायनान्सचे शेअर्स 0.93 टक्के, बीईएलचे 0.29 टक्के, एचडीएफसी बँकेचे 0.22 टक्के आणि एल अँड टीचे शेअर्स 0.20 टक्क्यांनी घसरले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts