• Home
  • मनोरंजन
  • ‘मर्दानी 3’ चा थरारक ट्रेलर रिलीज; राणी मुखर्जी पुन्हा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत, बाल तस्करांविरोधात निर्णायक लढा
मनोरंजन

‘मर्दानी 3’ चा थरारक ट्रेलर रिलीज; राणी मुखर्जी पुन्हा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत, बाल तस्करांविरोधात निर्णायक लढा

Rani Mukerji as Shivani Shivaji Roy in Mardaani 3 trailer
0

Mardaani 3 trailer  : राणी मुखर्जीचा बहुप्रतीक्षित चित्रपट मर्दानी 3 चा ट्रेलर आज रिलीज कऱण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मर्दानी 2 पेक्षाही भयानक कथा मर्दानी 3 मध्ये असणार आहे. या चित्रपटा आपल्याला अभिनेत्री राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.

मर्दानी 3 चित्रपटाचा 3 मिनिट 16 सेकंदाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला असून या ट्रेलरमध्ये धाडसी पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा राणी मुखर्जीचा हटके अंदाज दिसून येत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच शिवानी शिवाजी रॉय ही एका गंभीर मिशनवर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. रहस्यमरित्या बेपत्ता झालेल्या तरुण मुलींना वाचवण्यासाठी ती झगडताना या ट्रेलरमध्ये दिसते.

काय आहे कथा

या चित्रपटाची कथा तरुण मुलींच्या रहस्यमयरित्या बेपत्ता होण्यापासून सुरु होते. तपासावेळी तिचा सामना एका निर्दयी आणि शक्तिशाली गुन्हेगारी टोळीसोबत होतो. त्यावरून तिला मुलींच्या अपहरणामागे असलेले रहस्य समजते. हा तपास जसजसा खोलवर जातो, तशी शिवानीची भेट अम्मा नामक क्रूर खलनायकाशी होते. अम्मा ही भिकारी माफियाचे जाळे सांभाळते. आणि खासकरून लहान मुलींना लक्ष्य करते. चित्रपटात अम्माचा अवतार भयानक दाखवण्यहत आला असून ही भूमिका मल्लिका प्रसाद हिने साकारली आहे.

हे ही वाचा : बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये 17 स्पर्धकांची एंट्री; कसा असणार ग्रँड प्रीमिअर सोहळा

या दिवशी होणार प्रदर्शित

मर्दानी 3 चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनवाला यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन आयुष गुप्ता यांनी केले आहे. तर आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 30 जानेवारी रोजी येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts