Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महापालिकेसाठी पहिल्या दोन तासात मुंबईत 7 टक्के तर कोल्हापुरात सरासरी 10 टक्के मतदान
Mumbai

महापालिकेसाठी पहिल्या दोन तासात मुंबईत 7 टक्के तर कोल्हापुरात सरासरी 10 टक्के मतदान

Zilla Parishad

Mumbai Kolhapur Voting Percentage : आज महापालिका निवडणुकीला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर तुफान गर्दी केली आहे. आता सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे. पाहूया आतापर्यंत कुठे किती मतदान झाले.

मुंबईत सरासरी 6.98 टक्के मतदान

मुंबई येथे वार्ड क्रमांक 162 मध्ये सकाळी 7.30 वाजेपासून 9.30 वाजेपर्यंत 1.68 टक्के मतदान झाले असून वार्ड क्रमांक 18 मध्ये याच वेळात 11.57 टक्के मतदान आतापर्यंत झाले आहे. तर बहुतेक वॉर्ड मध्ये सरासरी 6.98 टक्के मतदान झाल्याचे दिसून येते. परंतु उच्चभ्रू भागात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे सध्या दिसून येत आहे. बृहन्मुंबई महापालिके सकाळी 7.30 वाजेपासून 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान पार पडले आहे.

सांगलीत दोन तासात 6.45 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यात सकाळी 7.30 वाजेपासून 9.30 वाजेपर्यंत 17 हजार 856 पुरुषांनी मतदान केले असून 11 हजार 439 महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण 29 हजार 296 मतदान झाले आहे. त्यानुसार एकूण टक्केवारी 6.45 टक्के मतदान झाले आहे.

कोल्हापूरात दोन तासात 9.64 टक्के मतदान

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत पहिल्या दोन तासांमध्ये 9.64% इतके मतदान झाले आहे. याठिकाणी एकूण 4 लाख 95 हजार इतके मतदा असून त्यापैकी पहिल्या दोन तासांमध्ये 47 हजार 698 इतके मतदान झाले आहे. यात पुरुषांनी 11.13% तर महिलांचे 8.13 टक्के मतदान आतापर्यंत पार पडले आहे.

परभणी दोन तासात 9.10 टक्के मतदान

परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात सकाळी 7.30 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 9.10 टक्के मतदान झाले असून जळगावात 5.30 टक्के मतदान पार पडले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts