Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांची जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरु; इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरु
Top News

अजित पवारांची जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरु; इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरु

Ajit Pawar Zilla Parishad Election Preparation
99

Ajit Pawar Zilla Parishad Election Preparation : महापालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी पार पडला. त्यानंतर 29 महापालिकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला. मुंबईत भाजपने एकहाती सत्ता मिळवली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मात्र अपयश मिळाले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवर असल्याचे बघायला मिळ आहे. मुंबई महापालिकेत मिळालेल्या अपयशानंतर ते आता पुण्यात आले आहे. तर काहीतरी महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या मार्गावर ते दिसतहे.

जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार

राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मुंबई सह पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील अपयशाचा सामना करावा लागला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करून येत्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महापलिक निवडणुकीत दोघांनी युती करून पुण्यातून महापालिका निवडणूक लढली होती. परंतु त्यात अपयश हाती लागल्यामुळे आता जिल्हा परिषदेत काय होणार हा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचामोठी बातमी! BMC महापौरपदावरुन भाजपाची ठाकरे गटासोबत चर्चा? शिंदेंचं काय होणार?

जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती

महापालिका निवडणुकीत अपयशानंतर मोठा निर्णय घेत अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. अजित पवार आता पुण्यातील बारामती हॉस्टेलवर ZP म्हणजेच जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यानुसार आता अजित पवार यांच्याकडून जिल्हा परिषदेची तयारी सुरु झाली असून नेमकं अजित पवार महापालिका निवडणुकांप्रमाणे शरद पवार यांच्या सोबत जिल्हा परिषद निवडणूक लढणार की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणे योग्य ठरेल.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका केली. त्यांनंतर या टीकेवर साडेत्तोर उत्तर देत महेश लांडगे यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts