Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महिला आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ तारखेला रंगणार पाकिस्तान विरुद्ध सामना
Top News

महिला आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ तारखेला रंगणार पाकिस्तान विरुद्ध सामना

Women’s Asia Cup Team India Announcement

सध्या महिला खेळाडू या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात खेळत आहेत. आरसीबीने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर इतर संघांमध्ये एका स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे. अशातच आता बीसीसीआय निवड समितीने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सर्वांना इच्छुकता असलेला भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित सामना 15 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

हेही वाचा – विजयानंतरही टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये होणार बदल? ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

मुंबईकर खेळाडूकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा

बीसीसीआयने वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने या स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघातील खेळाडूंनाही संधी दिली आहे. मुंबईकर राधा यादव या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. त्या व्यतिरिक्त तेजल हसनबीस, मिन्नू मणी आणि साइमा ठाकोर यासारख्या मुख्य संघातील खेळाडूंचा या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे.

या ग्रुपमध्ये पाकिस्तान वूमन्स ए संघाचा समावेश

आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत एकूण 8 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेचा थरार 13 ते 22 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार ए आणि बी अशा 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामन्यानंतर विजेता निश्चित होणार आहे. तसेच प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. इंडिया ए टीमचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान वूमन्स ए, यूएई आणि नेपाळ महिला संघाचा समावेश आहे.

इंडिया ए वूमन्स टीमचं वेळापत्रक

विरुद्ध यूएई वूमन्स, 13 फेब्रुवारी

विरुद्ध पाकिस्तान वूमन्स ए, 15 फेब्रुवारी

विरुद्ध नेपाळ वूमन्स, 17 फेब्रुवारी

आशिया कप 2026 स्पर्धेसाठी वुमन्स इंडिया ए टीम

राधा यादव (कर्णधार), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दीया यादव (फिटनेसवर अवलंबून), तेजल हसनबीस, नंदनी कश्यप (विकेटकीपर), ममता एम (विकेटकीपर), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, साइमा ठाकोर, जिंतमणि कलीता आणि नंदनी शर्मा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts