woman self-immolation attempt police office : पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुंडांकडून होत असलेल्या त्रासामुळे एक टपरी चालक महिलेने आत्मदहन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार गुंड या महिलेला सतत त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून टपरी चालक महिलेने गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या गुंडांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता सागर लांडगे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव असून या महिलेने त्रास देणाऱ्या सचिन डॅनियल खलसे या त्रास देणाऱ्या गुंडाना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार मोनिका जरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे ही वाचा : जळगावात हृदयद्रावक घटना! दोन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलले, गावकरी संतप्त
काय आहे प्रकरण
लांडेवाडी येथे अनिता लांडगे यांची ममता नावाची पानटपरी असून या टपरीवर गुंड खलसे आला. त्याने टपरीमधून सिगारेट आणि पाण्याची बॉटल घेतली. परंतु त्याने त्याचे पैसे दिले नाही. पैसे मागितले असता तुला जर पानटपरी चालवायची असेल तर प्रत्येक महिन्याला 500 रुपये हप्ता द्यावा लागणार. अन्यथा तुझी टपरी जाळून तुला मारून टाकेल. अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर अनिता लांडगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर देखील तो महिलेला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी महिला पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अनिता लांडगे आली. त्यांनतर पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यापासून थांबवले. त्यानंतर देखील ज्वलनशील पदार्थ तिने अंगावर ओतून घेतला. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.
गुन्हा दाखल करत अटक
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी सांगितले कि, संबंधित महिला आणि संशयितांची पूर्वीपासून वाद होते. या वादातून प्राथमिक तक्रार प्राप्त झाली होती. परंतु दुसऱ्यांदा तक्रार दिलेली नाही. अचानकच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खलसेवर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.












