• Home
  • गुन्हा
  • जेलमध्ये बसून 3 हत्या, बंडू आंदेकर तुरुंगात ‘क्वारंटाईन’ पोलिसांची मोठी कारवाई
Pune

जेलमध्ये बसून 3 हत्या, बंडू आंदेकर तुरुंगात ‘क्वारंटाईन’ पोलिसांची मोठी कारवाई

Bandu Andekar Jail

Bandu Andekar Jail : पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime News) मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी आता थेट कारागृहाच्या आतच मोठ्या कारवाईचं पाऊल उचललं आहे. कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला कारागृहातच ‘क्वारंटाईन’ करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बंडू आंदेकरला (Bandhu Andekar) तुरुंगात कुणालाही भेटता येणार नाही. त्याला इतर कैद्यांपासून आणि बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात येणार आहे. याबाबतचं पत्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Gupta) यांनी कारागृह प्रशासनाला दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात राहून बंडू आंदेकर हा अजूनही आपल्या टोळीच्या कारवाया नियंत्रित करत होता. कारागृहात होणाऱ्या भेटीगाठींचा गैरफायदा घेत, बंडू आंदेकर बाहेरील त्याच्या साथीदारांना सातत्याने चिथावणी देत होता आणि गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवण्याचे इशारे देत होता. हा प्रकार पुणे पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या आणि आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर तत्काळ ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बंडू आंदेकरला तुरुंगातच क्वारंटाईन करण्याचा निर्णय

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला लिहिलेल्या पत्रानुसार, बंडू आंदेकरला तुरुंगातच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंदेकरला आता यापुढे कोणत्याही व्यक्तीला, नातेवाईकाला किंवा साथीदाराला भेटता येणार नाही. त्याच्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. आंदेकर टोळीचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला कारागृहातच वेगळं ठेवलं जाणार आहे.

सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर केलं जाणार नाही

सुरक्षेचा उपाय आणि टोळीचा संपर्क तोडण्यासाठी पोलिसांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात बंडू आंदेकर याला कोणत्याही सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर केलं जाणार नाही. त्याला केवळ आणि केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच न्यायालयासमोर हजर केलं जाईल, जेणेकरून न्यायालयाच्या आवारातही त्याच्या साथीदारांशी किंवा टोळीशी संपर्क येणार नाही.

पत्र लिहून या नियमांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाला पत्र लिहून या नियमांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला आणि तो कारागृहाच्या आड असला, तरी त्याचे नेटवर्क चालू देणार नाही, असा स्पष्ट संदेश पुणे पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे. या ‘क्वारंटाईन’ कारवाईमुळे आंदेकर टोळीकडून सुरू असलेल्या हत्याकांडांना ब्रेक लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts