Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मराठी एकीकरण समितीच्या दुटप्पी भूमिका, टोपेबाज लोकांपासून सावध राहा; शिंदे गट आक्रमक
Top News

मराठी एकीकरण समितीच्या दुटप्पी भूमिका, टोपेबाज लोकांपासून सावध राहा; शिंदे गट आक्रमक

Shinde Group Attack on Marathi Ekikaran Samiti

Shinde Group Attack on Marathi Ekikaran Samiti : मिरा-भाईंदर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या भूमिकेवर शिंदे गट आक्रमक झाली आहे. मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या टोपेबाज लोकांपासून जनतेने सावध रहा, असा थेट इशारा शिंदे गटाने दिला आहे.

शिंदे गटाचे ओळवा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन मांजरेकर आणि संतोष गोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत गोवर्धन देशमुखांवर जोरदार टीका केली. मराठी महापौर झाला नाही तर रक्तरंजित राजकारण करू, असा इशारा देणारे गोवर्धन देशमुख प्रत्यक्षात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या इशाऱ्यावर नाचणारे तटाखालचे मांजर असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा – दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर, घड्याळाला मतदान करा; मंत्र्याचे मतदारांना आवाहन

मराठीच्या नावाखाली डबल गेम

महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या अमराठी उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी जाणीवपूर्वक शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात उबाठा आणि मनसेचे मराठी उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप मराठी एकीकरण समितीच्या कार्यालयातूनच झाले, असा गंभीर दावा सचिन मांजरेकर यांनी केला. राजू भोईर, पूजा आमगावकर, राजू वैतोस्कर यांसारख्या खऱ्या मराठी उमेदवारांचा पराभव घडवून आणणारा माणूस आज मराठी अस्मितेच्या गप्पा कशा काय मारतो? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या ३६ मराठी नगरसेवकांवर मौन का ?

भाजपचे ३६ नगरसेवक मराठी असताना त्यांना जाब विचारण्याऐवजी शहरात गोंधळ घालून वातावरण दूषित केले जात आहे, अशी टीकाही शिंदे गटाने केलीय. संतोष गोळे यांनी आंदोलनाच्या वेळेवर संशय व्यक्त करत, महापौर पदासाठी अर्ज दाखल होताच हे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून सुरू झाले? यामागचा स्पॉन्सर कोण आहे? असा सवाल केला.

महापौर पदाच्या उमेदवार रुबीना फिरोज शेख मराठी मुस्लिम कुटुंबातील – शिंदे गट

काही महिन्यांपूर्वी गवर्धन देशमुख स्थानबद्ध असताना त्यांना सोडवण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक पुढे आल्याची आठवणही त्यांनी करून दिली. महापौर पदाच्या उमेदवार रुबीना फिरोज शेख या मूळच्या मराठी मुस्लिम कुटुंबातील असून त्या मराठीच असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केलंय. त्यांच्या नावावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहरातील शांतता बिघडवून मराठीच्या नावाखाली स्वतःचे राजकारण थांबवावे, अन्यथा जनता योग्य धडा शिकवेल, असा थेट इशारा शिंदे गटाने पदाधिकारी सचिन मांजलेकर यांच्याकडून देण्यात आला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts