Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर पदावरून आंदोलन पेटलं, मराठी एकीकरण समिती आक्रमक
Top News

मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर पदावरून आंदोलन पेटलं, मराठी एकीकरण समिती आक्रमक

Controversy over non-Marathi mayor

Protests against Amarathi Mayor begin : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या (Mira Bhayandar Municipal Corporation) महापौर पदासाठी होत असलेल्या निवडणूकीवरून (Mira Bhayandar Mayoral Election) मोठं आंदोलन पेटलं आहे. भाईंदर महापालिकेत भाजपला एकहाती बहुमत मिळाले आहे. त्या अनुषंगाने भाजपने महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी उमेदवारी (Dimple Mehta is the candidate for the post of Mayor) दिली आहे. त्या आमदार नरेंद्र मेहता (MLA Narendra Mehta) यांच्या वहिनी आहेत. पालिकेत अमराठी महापौर (Controversy over non-Marathi mayor) देण्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक (Marathi Unification Committee becomes aggressive) झाली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी अमराठी उमेदवार दिल्याने एकीकरण समिती आणि मनसेकडून मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पोलिस आणि आक्रमक आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

हेही वाचा – मोठी दुर्घटना टळली! मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

मराठी महापौर नियुक्त करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीच्याआंदोलनाच्या आधीच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. त्यामुळे एकीकरण समितीचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

दरम्यान, मराठी एकीकरण समितीने महापौर पदावर मराठी उमेदवाराची नियुक्ती व्हावी, ही मागणी ठामपणे मांडली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या नोटिसांमुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनाला विविध मराठी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात येत असून, पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगरी कोळ्यांच्या शहरात महापौर स्थानिक मराठीच व्हायला पाहिजे

भाईंदर महापालिकेत मराठीच महापौर झालाच पाहिजे. नरेद्र मेहता मराठी द्वेष करून शहराची मराठी ओळख संपवत आहे. आमदार स्वतः आता पुन्हा महापौर म्हणून वहिनीला बसविले. सर्व शहर घरातच हवे का? आगरी कोळ्यांच्या शहरात महापौर स्थानिक मराठीच व्हायला पाहिजे. मराठी अस्तित्त्वाचा हा संघर्ष अटळ आहे, संयुक्त मराठी लढा मिरा भाईंदर पासून सुरू होतोय. रविंद्र चव्हाण निर्णय बदला, देवेद्र फडणवीस मराठीच महापौर हवा. भाईंदरमध्ये मराठी नाव जाहीर करून महापौर निवडा. तुम्ही सांगितले होते महापौर हिंदू मराठीच होतील, अशी भुमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts