Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • स्थानिक निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत, ठाकरे सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा
Top News

स्थानिक निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत, ठाकरे सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा

Shekhar Ghosale resigns

Shekhar Ghosale resigns : रत्नागिरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर, या निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सादर केला असून, या निर्णयामुळे पक्षांतर्गत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अलीकडील काळात शिवसेना उबाठामधील अनेक पदाधिकारी व नेत्यांनी इतर गटात प्रवेश केला असला, तरी सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंच्या पाठीशी उभा असल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला; पराभवानंतर रिल्सस्टार निर्मला नवले यांची पहिली प्रतिक्रिया

ठाकरेंच्या अनेक उमेदवारांचा पराभव काहीशे मतांनी झाला असून, बहुतांश ठिकाणी लढत एकतर्फी होऊ दिली गेली नाही. प्रमुख नेते तालुक्यात सक्रियपणे प्रचारात नसतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘मशाल’ हाती घेत ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. परिणामी रत्नागिरी तालुक्यात ठाकरेंच्या सेनेला सुमारे ४५ हजारांहून अधिक मते मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. यावरून ग्रामीण भागात आजही ‘ठाकरे म्हणजेच शिवसेना’ मानणारा मोठा वर्ग सक्रिय असल्याचे दिसून आले.

निवडणुकीतील पराभव मनाला लागल्याने राजीनामा

तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर घोसाळे यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत तालुक्यात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन त्यांनी शिवसेनेची होणारी पडझड काही अंशी रोखण्यात यश मिळवले होते. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील पराभव मनाला लागल्याने त्यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढेही शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार

राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शेखर घोसाळे म्हणाले की, आपण कट्टर ठाकरेप्रेमी असून पुढेही शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत अन्य पक्षात जाण्याचा विचार नाही. तालुक्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजूने असून, त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे पक्षकार्य सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts