Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बेंगळुरुमध्ये भीषण अपघात, महामार्गावर अनेक वाहनांची टक्कर; 7 जणांचा जागीच मृत्यू
गुन्हा

बेंगळुरुमध्ये भीषण अपघात, महामार्गावर अनेक वाहनांची टक्कर; 7 जणांचा जागीच मृत्यू

Multi Vehicle Chain Collision

Multi Vehicle Chain Collision : आज सकाळी बेंगळुरुजवळील होस्कोटच्या बाहेरील भागात एक भीषण रस्ता अपघात घडला. कार, दुचाकी आणि कॅन्टर वाहन यांच्यातील टक्करमुळं अनेक कुटुंबांना दुःख झाले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला. होस्कोट-दाबासपेटे राष्ट्रीय महामार्गावरील एम सत्यावरा गावाजवळ हा अपघात झाला.

वाहनांमध्ये जोरदार टक्कर :

पोलिसांनी सांगितलं की, होस्कोटहून देवनहल्लीकडे जाणाऱ्या एका कारनं मागून दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या टक्करनंतर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार कॅन्टर वाहनाला धडकली. आणखी एका कारलाही धडक बसली, ज्यामुळं एक गंभीर अपघात झाला. कारमधील सहा जण आणि दुचाकीस्वार जागीच मरण पावले. (Multi Vehicle Chain Collision )

अतिवेगानं वाहन चालवल्यानं गमावला जीव :

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, हा अपघात अतिवेगामुळं झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सहा जण कोठानूरचे रहिवासी होते, जरी त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की मृतदेह शवविच्छेदनासाठी होस्कोट सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं आहेत आणि ते कुटुंबियांना माहिती देण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास करत आहेत.

पोलीस घटनास्थळी पोहोचले :

अपघाताची माहिती मिळताच होस्कोट पोलिस घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी तात्काळ ढिगारा हटवला, मृतदेह ताब्यात घेतले, शवविच्छेदनासाठी पाठवले आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. काही काळ वाहतूक कोंडी कायम राहिली. पोलिसांनी बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक अहवालांवरून तपास सुरू आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts