Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • चंद्रपुरात भाजपचा महापौर तर ‘ठाकरे’ सेनेचा उपमहापौर, महापौर संगीता खांडेकर यांनी स्वीकारला कार्यभार
Top News

चंद्रपुरात भाजपचा महापौर तर ‘ठाकरे’ सेनेचा उपमहापौर, महापौर संगीता खांडेकर यांनी स्वीकारला कार्यभार

Chandrapur Mayor Deputy Mayor Power Sharing

Chandrapur Mayor Deputy Mayor Power Sharing : चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडमोडीनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहण सोहळा (Inauguration ceremony) दिमाखात पार पडला. मात्र, या सोहळ्याला राजकीय संघर्षाची आणि अंतर्गत नाराजीची किनार पाहायला मिळाली.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये ‘खोके युद्ध’ सुरु; कारण काय?

चंद्रपूरच्या नवनियुक्त महापौर (BJP mayor) संगीता खांडेकर (mayor Sangeeta Khandekar) यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार (mayor assumes office) स्वीकारला. राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची (Chandrapur municipal politics) सत्ता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपमहापौर (Thackeray Sena deputy mayor) प्रशांत दानव यांनीही आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.

विशेष म्हणजे, त्यांच्या पदग्रहण वेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे यांच्यात झालेल्या या अनोख्या युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

एकीकडे पदग्रहणाचा उत्साह असतानाच, दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. आमदार किशोर जोरगेवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करत, भाजपच्याच १६ नगरसेवकांनी कार्यक्रमातून बाहेर पडत आपला निषेध नोंदवला. यामुळे सत्तेच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी गोटात सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदग्रहण सोहळ्याने चंद्रपूरच्या राजकारणाला नवी दिशा दिली असली, तरी अंतर्गत नाराजीचा हा ‘सस्पेन्स’ येणाऱ्या काळात काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts