Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने मालेगाव महापालिकेत राजकीय वादळ 
Top News

उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने मालेगाव महापालिकेत राजकीय वादळ 

Malegaon Municipal Tipu Sultan Photo Controversy

Malegaon Municipal Tipu Sultan Photo Controversy : मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात वादग्रस्त टिपू सुलतान लावल्याने हिंदुत्ववादी संघटनाक्रमक झाल्या असून,त्यामुळे आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.त्यामुळे मालेगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून समाज माध्यमांवर दोन्ही बाजूने पडसाद उमटत आहे.

हेही वाचा –  चंद्रपुरात भाजपचा महापौर तर ‘ठाकरे’ सेनेचा उपमहापौर, महापौर संगीता खांडेकर यांनी स्वीकारला कार्यभार

उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनात लावला टिपू सुलतानचा फोटो आणि व्हिडिओ प्रकरण आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने त्याची दखल शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली असून महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात येत त्यांनी निषेध नोंदवत फोटो काढण्याची मागणी केली असून जो पर्यंत फोटो काढत नाहीत तो पर्यंत आम्ही जोरदार निदर्शन करत राहू यानंतर हे निदर्शन आंदोलनात परिवर्तन होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते. भाजपचे एक खासदार यांनी देखील मान्य केले होते की टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. महाराष्ट शासनाने देखील त्यांचा एका अधिसूचना नोंदणी करून त्यांची जयंती साजरी करावी अस सांगितलं आहे तर हे विरोध करणारे कोण आहेत अशा भाषेत उपमहापौर शान ए हिंद यांनी उत्तर दिले

एकंदरीतच मालेगावात टिपू सुलतानच्या छायाचित्रावरून निर्माण झालेल्या वादात मालेगावातील सत्ताधारी असलेल्या इस्लाम पार्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts