Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अमरावतीत शिवाई बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा मृत्यू
ताज्या बातम्या

अमरावतीत शिवाई बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा मृत्यू

MSRTC Shivai Bus
98

MSRTC Shivai Bus : अमरावती जिल्ह्यात बुधवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. वरुड-आष्टी रस्त्यावर राजुरा बाजार परिसरात एका भरधाव वेगातील शिवाई बसची ऑटोरिक्षाशी धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ऑटोरिक्षा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

आपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू :

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत वरुड-राजुरा बाजार रोडवर शिवाई एसटी बस आणि प्रवासी ऑटोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोमधील एका शाळकरी विद्यार्थ्यांनीसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर इथं हलवले आहे. ही शिवाई एसटी बस वरुडवरुन वर्धाकडे जात होती. दरम्यान, मागून एसटी बसनं प्रवासी आटोला जोरदार धडक दिली.

वरुड तालुक्यावर शोककळा :

हा अपघात इतका भीषण होता की ऑटोमधील पाच जणांचा जागीच चेंदामेंदा होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग झाले होते. तर या आटोचे दोन तुकडे झाले आहेत. तर एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरुप असून एसटी आणि एसटी चालक यांना वरुड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करत आहेत, परंतु या दुर्देवी या घटनेनंतर वरुड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून पंचनामा :

प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठी गर्दी जमली. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा (तपास अहवाल) आणि पुढील तपास सुरु केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts