Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “…तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य; नेमकं घडलं काय?
ताज्या बातम्या

“…तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य; नेमकं घडलं काय?

Donald Trump Sensational Claim | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Doland Trump) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी एक असा दावा केला आहे ज्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. “जर वेळेवर मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना (Pakistani Prime Minister) आपला जीव गमवावा लागला असता”, असं खळबळजनक वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

हेही वाचा – नेपाळमध्ये मोठा अपघात; नदीत बस कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत (US Parliament) भाषण केलं. त्यांनी दिलेल्या आपल्या ‘स्टेट ऑफ द यूनियन 2026’ (State Of The Union 2026) या भाषणामध्ये मोठा दावा केला. यादरम्यान त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत (India-Pakistan War) भाष्य केलं. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र उंबरठ्यावर होते. पण मी केलेल्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबलं आणि तब्बल साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले, असं ट्रम्प म्हणाले.

पुढे ट्रम्प म्हणाले की, मी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना 200 टक्के आयात शुल्काची धमकी दिली होती. जर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले नाही तर तुमच्यासोबत होणारा सर्व व्यापार बंद करू, असा दम भरल्यानंतरच भारत आणि पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी युद्धविराम जाहीर केला होता.

युद्धादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांची अनेक लढाऊ विमाने पाडली होती. त्यामुळे ही परिस्थिती अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होती, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची भूमिका काय?

ट्रम्प यांनी केलेला मध्यस्थीचा दावा भारतानं फेटाळून लावला आहे. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी थेट चर्चा करत हे युद्ध थांबवलं होतं. तसेच पाकिस्तान असो किंवा काश्मीर असो यासंबंधित कोणाताही विषय हा द्विपक्षीय असून यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, असं भारत देशानं सांगितलं होतं. तरी देखील ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तान युद्धाबाबत दावे करतच आहेत, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts