Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
ताज्या बातम्या

अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Rohit Pawar Meet Raj Thackeray | मागील काही दिवसांपासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे अजित पवारांना (Ajit Pawar) न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना काहीही यश मिळत नसल्याचं दिसून येत आहे. तर अजित पवारांच्या विमान अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) चौकशी नीट केली जात नाही, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला जात नाही म्हणून आज (27 फेब्रुवारी) रोहित पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) असून एका मराठी माणसाची तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीत, ही व्यथा रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे मांडली.

हेही वाचा – अजित पवारांचा अपघात की घातपात? सीआयडीचा धक्कादायक खुलासा, तपासामध्ये काय आढळलं?

मनसेने आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून रोहित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. विमान कंपनीवर गुन्हा दाखल केला जात नाही आणि अजित पवारांच्या अपघाताची नीट चौकशी केली जात नाही म्हणून हा लढा लढण्यासाठी मनसेनं पाठिंबा द्यावा, यासाठी रोहित पवार राज ठाकरेंकडे गेले होते. याबाबत रोहित पवारांनी स्वत: माध्यमांसमोर येत राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं? याबाबतची माहिती दिली.

रोहित पवार आणि राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला राज ठाकरेंना अजितदादांच्या अपघात, घातपाताविषयी माहिती द्यायची होती. मी सर्व माहिती राज ठाकरेंना समजावून सांगितली आणि त्यांनी ती समजूनही घेतली. तसेच पोलिसांनी तक्रार दाखल का केली नाही? याबाबत राज ठाकरेंनी मला समजावून सांगितले. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. ज्यामध्ये अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट झाला तर एफआयआर घेतलाच पाहिजे. दुसरा दाखल म्हणजे काहीही झाले तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असं राज ठाकरेंनी मला सांगितल्याची माहिती रोहित पवारांनी दिली.

मराठी माणसाला न्याय मिळवण्यासाठी जे काय करावं लागेल ते करू…

पुढे ते म्हणाले, राज ठाकरेंनी मला सांगितलं आहे की, मी दादांना ओळखत होतो. आम्ही दोघांनी जवळून काम केले आहे. जेव्हाही आमची भेट व्हायची तेव्हा आम्ही बोलायचो. जर मराठी माणसाला न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू, असंही रोहित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, मराठी माणसाठी राज ठाकरे लढत आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे येत्या काही काळात कळेलच, असंही रोहित पवार म्हणाले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts