Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इस्रायल-इराण युद्धाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार? काय होऊ शकतो परिणाम
Top News

इस्रायल-इराण युद्धाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार? काय होऊ शकतो परिणाम

Israel-Iran War

Israel-Iran War : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला करत युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रतिवार केलाय. इराणने अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलच्या 4 बड्या शहरांवरही क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. अशातच आता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतालाही याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. या युद्धामुळे भारताला काय फटका बसू शकतो याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

हेही वाचा – शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल होताच, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे युद्धामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या तेलाची 85 टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण होते. त्यामुळे जर कच्च्या तेलाच्या किमतीत एका डॉलरचीही वाढ झाली तर भारताचे वार्षिक आयात बिल 9000 कोटींनी वाढेल आणि याचा थेट अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांवर परिणाम होईल. त्याचबरोबर बासमतीसह अनेक कृषी वस्तूंच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.

भारत इराण व्यापाराला फटका

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत आणि इराणमधील व्यापार कमी झाला आहे. 2024-25 आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार अंदाजे 1.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. यापैकी भारताने 1.24 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती. तर इराणमधून भारताने 0.44 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली होती. मात्र आता या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढणार

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक तेल उत्पादनात इराणचा वाटा 4-5% आहे. त्यामुळे जागतिक पुरवठ्यात घट झाल्यास तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. त्यामुळे भारताला वाढीव दराने कच्चे तेल खरेदी करावे लागू शकते. यामुळे भारताची वित्तीय तूट वाढेल आणि भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव येईल. सध्या जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 71 अमेरिकन डॉलर्स आहेत. मात्र हे युद्ध असेच सुरू राहिले तर तेलाच्या किमती 91 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे देशातील इंधनाच्या किमती वाढू शकतात, यामुळे महागाई वाढेल आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts