Attack On The American Embassy In Pakistan | अमेरिका (America) आणि इस्त्रायलने (Israel) मिळून इराणवर (Iran) हल्ला केल्याने चांगलंच युद्ध पेटलं आहे. या युद्धात आज इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Supreme Leader Ayatollah Ali Khameneni) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मृत्यूनंतर इराण देशात संतापाचे वातावरण असून त्यांनीही इस्त्रायल, अमेरिका आणि दुबईवर (Dubai) हल्ला करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे युद्धाचा वणवा चांगलाच पेटला आहे. अशातच आता आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आल्यामुळे अमेरिकेचा आणि इस्त्रायलचा मुस्लीम देशांकडून निषेध केला जात आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये (Pakistan) तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कराचीमधील अमिरेकन दुतवासांवर (American Embassy) हल्ला करण्यात आला आहे.
हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी; म्हणाले, आम्ही इतका मोठा हल्ला करणार की तुम्ही…
पाकिस्तानमध्ये लोक आक्रमक
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील लोक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट कराचीमधील अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड केली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी लोकं रस्त्यावर उतरली असून निदर्षने करत आहेत.
कराचीमध्ये अमेरिकन दुतवासाला केले टार्गेट
कराचीमध्ये वातावरण पेटलं असून तेथील स्थिती अत्यंत वाईट आहे. दंगेखोरांनी कराचीमधील अमेरिकन दुतावासाला टार्गेट केले आहे. यामध्ये त्यांनी तोडफोड करत जाळपोळ केली असल्याची माहिती समोर आली. तर कराचीतील दंगेखोरांवर पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.












