Rajya Sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2026) भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर (List of candidates announced) केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते (Ramdas Athawale, Vinod Tawde, Ramdas Vadkute, Maya Ivanate) यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, श्रीमती माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी निवडणूक
निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
असे आहे राज्यसभा जागांचे गणित?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण जागा – 7
सध्या विधानसभा सदस्यांची संख्या – 286
(अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त)
कोटा : 3576 विजयासाठी (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
(फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
(अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)












