• Home
  • देश
  • युद्धाच्या रणधुमाळीत इराणचा मोठा निर्णय, अमेरिकेसोबत युद्ध सुरू असताना केली ‘ही’ मोठी घोषणा
Top News

युद्धाच्या रणधुमाळीत इराणचा मोठा निर्णय, अमेरिकेसोबत युद्ध सुरू असताना केली ‘ही’ मोठी घोषणा

iran 3

Iran’s New Supreme Leader Mojtaba Khamenei | सध्या अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामध्ये मोठा फटका बसला आहे तो इराणला. कारण अमेरिका, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी (Ali Reza Arafi) यांच्या नावाची घोषणा केली होती. तर सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही तासातच त्यांनाही ठार करण्यात आले. त्यामुळे इराणचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तर आता अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – अमेरिकेचा महाप्रहार! इराणच्या युद्धनौका उद्ध्वस्त, हजारो तळांवर बॉम्बवर्षाव

इराणने काय घेतला निर्णय?

अली रजा अराफी यांच्या मृत्यूनंतर आता इराणने आणखी एका नवीन नेत्याची सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांची निवड इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे आता इराणची सर्व जबाबदारी मोज्तबा खामेनेई यांच्याकडे असणार आहे.

इराण सध्या अत्यंत वाईट परिस्थितून जात आहे. आधी त्यांचे दोन सर्वोच्च नेते ठार करण्यात आले, तर आता त्यांच्या युद्धनौका उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. तसेच इराणमधील शाळा, सरकारी इमारतींवरही अमेरिका, इस्त्रायलकडून हल्ला केला जात आहे. यामध्ये इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणताही देश त्यांच्यासोबत उभा राहिलेला नाहीये. त्यामुळे इराण स्वबळावर लढताना दिसत आहे.

दरम्यान, इराणने अमेरिका आणि इस्त्रायल तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमेरिकेच्या लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इराणचे सर्व हल्ले हवेतच नष्ट केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या अमेरिकेने इराणवर प्रतिहार केला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात अमेरिकेने इराणच्या 17 युद्धनौका पाण्यातच उद्धवस्त केल्या आहेत. तर 2000 हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts