Ind vs Eng 2nd Semi Final Match | भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय क्रिकेट संघानं फायनलमध्ये (Final) दणक्यात एन्ट्री घेतली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात भारतीय संघानं आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 (ICC T20I World Cup 2026) स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर (England) 7 धावांनी विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा दारूण पराभव केला. भारतीय संघानं इंग्लंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान इंग्लंडला पेलता आलं नाही.
हेही वाचा – भारतीय हवाई दलाला मोठा धक्का! भारताचे सुखोई-30 अचानक रडारवरून गायब, दोन पायलटांचे काय झाले?
इंग्लंडच्या विल जॅक्सचे शर्थीचे प्रयत्न…
भारतीय संघानं 254 धावांचं आव्हान दिल्यानंतर इंग्लंडने शेवटच्या बॉलपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. विल जॅक्सने शतक ठोकत इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, इंग्लंडचे हे प्रयत्न अपुरे पडले. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 246 रन्स करत 7 विकेट्स गमावल्या आणि भारतीय संघाला विजय मिळाला. भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.
ईशान किशन, संजू सॅमसनची धमाकेदार बॅटिंग
इंग्लंडने टॉस जिंकत भारताला बॅटिंग करण्यासाठी भाग पाडले होते. तर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 253 धावा करत 7 विकेट्स गमावल्या. ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी धमाकेदार अशी खेळी खेळली. संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावा केल्या तर इशान किशनने 39 धावा केल्या. सोबत शिवम दुबे यानेही 43 रन्स करत मोठं योगदान दिलं. या खेळाडूंसोबत हार्दिक पंड्या, तिलक वर्मा यांनीही कडक खेळी खेळली. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दुसरीकडे, इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने 1 विकेट घेतली. तर विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. विजय मिळवण्यासाठी इंग्लंडच्या जेकब बेथलने खूप प्रयत्न केले, पण त्याचे प्रयत्न कामी आले नाहीत. बेथलने सर्वाधिक 105 रन्स करत शतक ठोकले. त्याने 7 सिक्स मारत 48 बॉलमध्ये 105 धावा केल्या. तर खेळाडूंनीही चांगले योगदान दिले, मात्र त्यांना भारतीय संघाने दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही आणि ते अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरले.











