Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मोठी दुर्घटना! ‘सुखोई-30’ आसामच्या जंगलात कोसळले, दोन पायलट शहीद
Top News

मोठी दुर्घटना! ‘सुखोई-30’ आसामच्या जंगलात कोसळले, दोन पायलट शहीद

Sukhoi-30 Crash In Assam Jungle | भारतीय हवाई दलाला (Indian Air Force) मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचे सुखोई-30 (Sukhoi-30) एमकेआय फायटर जेटचा (Fighter Jet) भीषण अपघात (Accident) झाला आहे. हे फायटर जेट आसामच्या (Assam) जंगलात कोसळत त्याचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन पायलट शहीद झाले आहेत. स्क्वाड्रन लीडर अनुज (Sqn Ldr Anuj) आणि फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरागकर (Flt Lt Purvesh Duragkar) अशी शहीद झालेल्या शूरवीरांची नावे आहेत.

हेही वाचा  – इराणच्या युद्धामुळे पाकिस्तान संकटात; इंधनचा मोठा तुटवडा, पेट्रोल पंपावर झुंबड

अपघातात दोन वैमानिक शहीद, वायुसेनेकडून शोक व्यक्त

भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय विमान हे अचानक बेपत्ता झाले होते. आसामच्या जोरहाट विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. तर संध्याकाळी 7.42 च्या सुमारास त्याचा रडारशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाचा कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. नंतर या विमानाचा शोध घेण्यास सुरूवात झाली होती. तर सर्च ऑपरेशनदरम्यान आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील घनदाट जंगलात या विमानाचा शोध घेण्यात आला, ज्यामध्ये दोन्ही पायलटचा मृत्यू झाला होता. या अपघातातील दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आले नाही.

अपघातात दोन्ही पायलट शहीद झाल्याबद्दल वायुसेनेकडून शोक व्यक्त करण्यात आला. “भारतीय वायुसेना फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरागकर आणि स्क्वाड्रन लीडर अनुज यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आहे. या कठिण प्रसंगी शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी वायुसेना खंबीरपणे उभी आहे”, असे वायुसेनेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सुखोई-30 उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजान येथील रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे, सुखोई विमान जंगलात कोसळले होते. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विमानाचा शोध त्या दिशेने सुरू करण्यात आला होता. तर घनदाट जंगलात विमान कोसळल्यामुळे त्या भागात विमानाचा शोध घेतला जात होता.

याआधीही झालेले सुखोई-30 विमानाचे अपघात

भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान हे सुखोई विमान आहे. हे विमान हवाई दलाच्या संरक्षणाचे कवच मानले जाते. तर आज झालेल्या अपघाताआधीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये 2025 मध्ये तेजपूर एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक सुखोई विमान कोसळले होते. मात्र, या अपघातातील दोन्ही पायलट सुदैवानं बचावले होते. तर ऑगस्ट 2019 मध्ये तेजपूरजवळ सुखोई विमान भाताच्या शेतीत कोसळले होते आणि अपघात झाला होता. तेव्हाही अपघातादरम्यान दोन्ही वैमानिकांनी सुरक्षितपणे झेप घेत स्वत:चा बचाव केला होता.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts