Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अखेर सुनेत्रा पवार बोलल्या; अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर केला मोठा खुलासा, म्हणाल्या, पूर्ण अहवाल…
Top News

अखेर सुनेत्रा पवार बोलल्या; अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर केला मोठा खुलासा, म्हणाल्या, पूर्ण अहवाल…

Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Crash | राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) एकच खळबळ उडाली होती. तसेच अजित पवारांच्या अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजितदादांचा अपघात होता की घातपात होता? असा संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळे या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तसेच आता अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तर आता या अहवालावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

हेही वाचा – आजोबांपेक्षा नातू वरचढ! पार्थ पवारांची पेक्षा शरद पवारांपेक्षा अफाट पैसा, प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर काय बोलल्या सुनेत्रा पवार?

नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत विचारणा केली. यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, वेगवेगळ्या एजन्सीमार्फत अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. तसेच आता फक्त प्राथमिक अहवाल आला आहे. पण आता आलेला अहवाल संपूर्ण अहवाल नाहीये. त्यामुळे पूर्ण अहवाला अल्यानंतरच मी यावर भाष्य करेन, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या अपघात प्रकरणाबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) प्रसिद्ध केला आहे. तर या अहवालातील अपघाताची निरीक्षणे आणि प्राथमिक कारणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या या घटनेचा संपूर्ण तपास DGCA, CID आणि AAIB यांसारख्या संस्थांकडून केला जात आहे.

अहवालातून काय स्पष्ट झालं?

आता समोर आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अजित पवारांच्या विमान अपघातादरम्यान बारामती विमातळाच्या परिसरात दाट धुके होते. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (ATC) दृश्यमानता 3 किमी असल्याचं कळवलं होतं, मात्र तरीही लँडिंगचा पहिला प्रयत्न सफल ठरला नाही. त्यानंतर धावपट्टी दिसल्याचा अहवाल दिल्यानंतर पायलटने दुसऱ्यांदा लँडिंगसाठी प्रयत्न केला. पण, काही क्षणांतच विमानाचा ताबा सुटला आणि अपघात झाला, असं अहवालातून स्पष्ट झाले आहे.

अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणानुसार, विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उजव्या बाजूला झुकले होते. तर विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने “Oh Shitt…” असे उद्गार काढल्याचं रेकॉर्ड झाले आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत VSR कंपनीवर आणि या कंपनीचे मालक रोहित सिंहवर (Rohit Singh) गंभीर आरोप केले. तसेच अजित पवारांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनीही काही दिवसांपूर्वीच रोहित सिंहचा चालू विमानातील एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रोहित सिंह पायलटच्या मुख्य सीटवर बसून झोपलेला दिसत होता. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सवाल निर्माण केला. या सर्व घडामोडींनंतर रोहित पवार यांनी रोहित सिंहवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली आहे. यादरम्यान, VSR कंपनीचा मालक रोहित सिंह 5 मार्च रोजी पुण्यात दाखल होत तो सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला होता. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत रोहित सिंहची चौकशी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित सिंह भारत सोडून गेल्याचा दावा केला जात होता. पण अचानक रोहित सिंह सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अजित पवार विमान अपघात प्रकरणाची सीआयडी कसून चौकशी करत आहे. तर आता रोहित सिंहची सीआयडीकडून चौकशी केली जात असून आता नवीन काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts