Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • युद्ध थांबणार की भडकणार? संघर्षात नवा ट्विस्ट; इराणचा अमेरिकेला थेट इशारा, म्हणाले, युद्धाचा शेवट…
Top News

युद्ध थांबणार की भडकणार? संघर्षात नवा ट्विस्ट; इराणचा अमेरिकेला थेट इशारा, म्हणाले, युद्धाचा शेवट…

Iran-America War | नुकताच सर्व देशांना मोठा दिलासा मिळाला होता. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिका (America) , इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) जवळपास संपले असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक देशांच्या डोक्यावरील ओझं कुठेतरी कमी झालं होतं. अशातच आता इराण देश मात्र हे युद्ध थांबवण्याच्या मूडमध्ये नसल्याचं दिसत आहे. कारण इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे.

हेही वाचा – युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; इराणला दिला कडक इशारा, म्हणाले, जर काही केलं तर…

इराणने अमेरिकेला काय दिला इशारा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध जवळपास संपले आहे, अशी घोषणा केली होती. तर त्यांच्या या वक्तव्यावर इराणने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. हे युद्ध कधी संपवायचे हे अमेरिका ठरणार नाही तर ते आम्ही ठरवू, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबत असतानाच अचानक इराणने नवीन ठिणगी टाकल्याने हे युद्ध पुन्हा पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) म्हटले की, या युद्धाचा शेवट कधी करायचा ते आम्ही ठरवू. अमेरिकेचे सैन्य हे युद्ध संपवू शकत नाही. कारण भविष्यातील परिस्थिती आणि राजकीय समीकरणे आमच्या सैन्याच्या हातात आहेत, असं इराणने म्हटलं आहे. इराणच्या या पवित्र्यामुळे अमेरिका पुन्हा आक्रमक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेली घोषणा?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हे युद्ध जवळपास संपले आहे. तसेच मी जगाला कोणत्याही दहशतवादी राजवटीला ओलीस ठेवू देणार नाही. तेल पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्नही करू देणार नाही. मात्र, जर इराणने काही केले तर त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागले. अमेरिका इराणवर बारीक नजर ठेवून आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, सध्या अमेरिकेने इराणमधील काही वीज निर्मिती केंद्रांना टार्गेट केलेले नाही. पण जर इराणने काही केलं तर मात्र आम्ही त्यांच्या ऊर्जा केंद्रांना पुन्हा टार्गेट करू आणि हल्ला करू, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

इराणने युद्धादरम्यान जागतिक शिपिंग आणि तेल पुरवठ्याला निर्माण केलेला धोका निष्प्रभ होईल. त्यामुळे तेलाच्या किंमतींमध्ये घसरण होणार आहे. अमेरिकेतील नागरिकांसाठी तेलाच्या किंमती कमी होतील, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts