(Parali Crime News : बीड जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील (Parali Crime News) धारावती तांडा येथील एका १६ वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर (16-year-old Girl) दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही अवघ्या १६ वर्षांची आहे. गावातील ओळखीच्या दोन आरोपींनी तिला गोडीने आपल्या घरी बोलावून घेतले. मुलीच्या मनात कोणतीही शंका नव्हती. मुलगी घरात येताच नराधमांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर एका आरोपीने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले आणि ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. या असहाय्यतेचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी तिच्यावर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला. या घटनेची मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले.
कोणाला सांगितला, तर तुला जीवे मारून टाकू पिडीतेला धमकी
हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पिडितेला धमकावल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुला जीवे मारून टाकू. या धमकीमुळे दहशतीखाली असलेल्या मुलीने कशीबशी आपली सुटका करुन घर गाठले. तसेच घरी पोहोचल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांच्या हालचालींची कुणकुण लागताच दोन्ही आरोपी फरार झाले. याआधी देखील अशा तक्रारी आरोपींच्या विरोधात असल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले आहे.






