Breaking News :
  • Home
  • देश
  • आता पेट्रोल-डिझेलही महागणार? ग्राहकांचा खिशा कापणार?
Top News

आता पेट्रोल-डिझेलही महागणार? ग्राहकांचा खिशा कापणार?

petrol -diesel
71

Petrol and diesel more expensive : भारतात एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याने नागरिक आधीच हैराण झाले असतांनाच आंतराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे कच्चा तेलाच्या (Crude Oil) किंमतीत वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे. सध्या कच्चा तेलाच्या किंमती ११९ डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्याने तेल कंपन्यांची (Oil Companies) चिंता वाढली आहे. परिणामी एलपीजी (Lpg)सिलेंडर पाठोपाठ पेट्रोल-डिझेलही ग्राहकांचा खिसा कापणार की काय अशी भीती व्यक्त केली जातेय.

हे ही वाचा:जागतिक बाजारात खळबळ! रशियन तेलवाहू जहाजाचा यू-टर्न; चीनकडे निघालेलं जहाज अचानक भारताकडे वळले

कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पुढे

इस्राईल-इराण युद्ध (Israel-Iran War) सुरु झाल्यापासून कच्चा तेलाच्या किंमती ६५ ते ७५ डॉलरदरम्यान होत्या. आज या किंमती १०० डॉलरच्या पुढे पोहचल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका वर्षात होणारी वाढ अवघ्या एका महिन्यात झाली आहे. कच्चा तेल्याच्या किंमतीत ४३ टक्क्यांहून अधिकची उसळी दिसून आली. रोजच्या किंमतीत थोडाफार चढउतार दिसून येत आहे.त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढण्याची शक्यता अमेरिकन बेंचमार्ककडून (American benchmark )व्यक्त केली जात आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत

इस्राईल-इराण देशात मोठया प्रमाणात इंधन साठा आहे. या देशांकडून अनेक देशाना इंधनाचा पुरवठा केला जातो. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी मालवाहू जहाजांना मोठा धोका निर्माण झालाय. याशिवाय अनेक देशांचे छुप्या हेतूमुळे इंधनाच्या किंमतींना उकळी फुटली आहे. त्यात भारतासह चीन,रशिया आणि ब्रिक्स देशांना टार्गेट करण्यात येत आहे.

नागरिकांना बसणार फटका

जेव्हा जागतिक बाजारात कच्चे तेल महाग होते, तेव्हा त्याचा फटका ग्राहकांना बसतो. त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होतो. इंधन महाग होते. अगोदरच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यात एलपीजी सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांचा संताप होत आहे. आता पेट्रोल-डिझेल पण त्यांच्या खिशावर दरोडा घालणार का, अशी चर्चा होत आहे. डिझेल महागल्यास रोजच्या वापरातील वस्तू, भाजीपाला, फळं, किराणा आणि इतर वस्तू महाग होईल आणि सर्वांनाच त्याचा फटका सहन करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts