Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग; शेतकरी संकटात

unsesional rain

Unseasonal rain in maharashta : हवामानात सातत्याने बदल होत असल्याने महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग दाटून आले आहेत. राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (yelo allert) तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा (orang allert)  इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकरी (farmer) संकटात आले आहेत.फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले होते, त्यातच आता मार्च महिन्यात अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. सातत्याने हवामानात (weather)  बदल होत असल्याने शेतकरीही मेटाकुटीला आले आहेत. अवकाळीमुळे हाताशी आलेले पीक वाया जाते कि काय अशी भीती शेतकर्यानी व्यक्त केली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले. मार्चच्या पूर्वार्धात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला. तर आता याच मार्च महिन्यात राजयात अवकाळी पाऊस बरसत असून पावसाचे येलो व ऑरेंज अलर्ट दिले जात आहेत.

हे ही वाचा:फिरायला गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन मित्रांना काळाने गाठले; राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू

उत्तर कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

गुरुवारी उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील ज्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकरी संकटात

राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच मका पीकही वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या शेतीच्या नुकसानीकडे कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts