Divyanka Tripathi Pregnant | प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहियाच्या (Vivek Dahiya) घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दिव्यांका त्रिपाठीने चाहत्यांना गुड न्यूज (Good News) दिली आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेकने ही आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच दिव्यांका आणि विवेक आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे दिव्यांका-विवेकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा – “चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट
दिव्यांका-विवेकने चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज
दिव्यांका आणि विवेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दिव्यांकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिव्यांकाने आणि विवकने प्रेग्नंसीचे फोटोशूट केलेले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत दिव्यांकाने म्हटलं आहे की, “10 वर्षांनंतर एक नवीन प्रवास. काही प्रवास हे घाईगडबडीत करायचे नसतात तर ते एकत्र मिळून करायचे असतात. जेव्हाही तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यातील कहाणी पूर्ण झाली आहे तेव्हा आयुष्य त्या कहाणीमध्ये सर्वात सुंदर अध्याय जोडते. त्यामुळे आम्ही देखील अजूनही ती भावना पुन्हा अनुभवत असून विनाकारण हसत आहोत, असं दिव्यांकाने म्हटलं आहे.
View this post on Instagram
दिव्याकांने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक जीवनाबाबत सांगितले. ती म्हणाली की, मला आणि विवेकला खूप दिवसांपासून बाळ हवे होते आणि आम्ही प्रयत्नही करत होतो. तसेच जेव्हा प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा आम्हा दोघांना खूप आनंद झाला होता. आम्ही दोघं स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. जेव्हा प्रेग्नंसी टेस्ट केल्यानंतर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा ही बातमी सर्वात पहिली मी विवेकला सांगितली होती, त्यानंतर आई-वडीलांना सांगितली. ही बातमी ऐकून आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
दिव्यांकाने सहा महिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी गुप्त ठेवली होती. सातव्या महिन्यात तिने गरोदर असल्याची बातमी चाहत्यांनी दिली. याबाबतही दिव्यांकाने स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली की, ही बातमी आम्ही योग्य वेळ आल्यावर सर्वांना सांगायचे असे ठरवले होते. तसेच मी हल्ली जास्त बाहेर पडत नाही त्यामुळे ही बातमी गुप्त ठेवणे आमच्यासाठी सोपे होते. तसेच आमच्या बाळाचा जन्म जून महिन्यात होईल, असंही दिव्यांकाने सांगितले.
दिव्यांका आणि विवकने गुड न्यूज दिल्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, दिव्यांका आणि विवेक हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून दिव्यांका घराघरात पोहोचली होती. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तिने आणि विवेकने 2016 मध्ये लग्न केलं होतं. तर आता त्यांनी गुड न्यूज दिली असून सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.







