Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • बारामतीतील अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला अजित पवार यांचे नाव दिलेला जीआर अखेर रद्द
Top News

बारामतीतील अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला अजित पवार यांचे नाव दिलेला जीआर अखेर रद्द

Renaming Government Order Cancelled
83

Renaming Government Order Cancelled : बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 31 मे 2023 रोजी शासनाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Hospital Name Change) यांचे नाव दिले होते. मात्र याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाला स्वर्गीय अजित पवार (Late Ajit Pawar) यांचे 2 मार्चला नाव देण्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Medical Education) जीआर काढला होता. हा जीआर काढल्याने धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. 9 मार्च दिवशी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या शासकीय महाविद्यालयाच्या समोर सकल ओबीसी समाज, धनगर समाजाच्या वतीने निषेध सभा देखील घेतली होती. मोठ्या प्रमाणावर होणारा विरोध लक्षात घेता आता हा जीआर रद्द (Government Resolution Cancelled) करण्यात आला आहे.

हेही वाचा – “चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

जर सर्वोपचार रुग्णालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जर नाही केले तर बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. अखेर आज राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला उपरती आली आहे. आज अधिवेशनामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2 मार्च 2023 रोजी स्वर्गीय अजित पवार यांचे नाव दिलेला जीआर अखेर रद्द करत सर्वोपचार रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेच नाव देण्याची घोषणा केली आहे.

यानंतर आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयासमोर सकल धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पाडव्यानिमित्तान गुढी उभारून ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद साजरा करत एकमेकांना पेढा भरून आनंद उत्सव साजरा करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या, यावेळी फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts