Breaking News :
  • Home
  • देश
  • कुख्यात डॉन दाऊदचे नामोनिशाण मिटणार? कोकणातील वडिलोपार्जित जमीनीची लवकरच विक्री
Top News

कुख्यात डॉन दाऊदचे नामोनिशाण मिटणार? कोकणातील वडिलोपार्जित जमीनीची लवकरच विक्री

dawood ibraham
67

notorious don Dawood land : कोकणातील खेड तालुका (khed taluka)  मुंबके (mumbake gaon)गावातील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (don dawood ibrahim)याच्या वडिलोपार्जित जमीन विक्री होणार आहे. या जमिनींना खरेदीदार मिळाला आहे. केंद्र सरकारने ५ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या लिलावात मुंबईतील एका बोलीदाराने (Bidder) सर्वाधिक बोली लावली. त्यात चारही शेतीजमिनी खरेदी करण्याचा हक्क मिळवला आहे.हा लिलाव ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स (Smugglers and Foreign Exchange Manipulators act) कायदा’ अंतर्गत पार पडला. त्यामुळे कुख्यात डॉन दाऊदचे कोकणातील नामोनिशाण मिटणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:पर्शियन आखातात अडकली २२ भारतीय जहाजे; इंडियन नेव्हीने शस्त्रसज्ज वॉरशिपची वाढवली संख्या

विक्री प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित

दाऊदच्या जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री प्रक्रियाअनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र आता या विक्री प्रकियेला गती मिळाली आहे. या चारही जमिनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावात आहेत. जे दाऊद इब्राहिमच्या वडिलांचे गाव आहे. काही जमिनी त्याची आई अमीना बी यांच्या नावावर होत्या. लिलावात सर्वाधिक बोली लावणारा व्यक्ती मुंबईतील आहे. परंतु त्याची ओळख सांगण्यात आलेली नाही. नियमांतर्गत एप्रिल २०२६ च्या सुरुवातीपर्यंत संबंधित बोलीदाराने संपूर्ण रक्कम जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर संबंधित प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळाल्यावर मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

‘डी-कंपनी’शी संबंधित नाव असल्याने संभाव्य खरेदीदार राहिले दूर

दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी-कंपनी’शी संबंधित नाव असल्यामुळे अनेक संभाव्य खरेदीदारांनी या मालमत्तांपासून दूर राहणे पसंत केले. तसेच, या जमिनी ग्रामीण भागात असून त्यांचा वापर प्रामुख्याने शेतीसाठीच मर्यादित असल्याने त्वरित आर्थिक लाभ दिसत नव्हता हे देखील एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

या जमिनींसाठी बोली?

चारही जमिनींपैकी सर्वाधिक चर्चेत असलेली सर्वे क्रमांक ४४२ (भाग १३-बी) ही जमीन होती. तिची राखीव किंमत सुमारे ९,४१ लाख रुपये होती, मात्र लिलावात या जमिनीला १० लाख रुपयांहून अधिक बोली मिळाली. या प्लॉटसाठी दोन बोलीदार होते एक मुंबईहून आणि दुसरा रत्नागिरीतील आहे. उर्वरित तीन जमिनी (सर्वे क्रमांक ५३३, ४५३ आणि ६१) यांसाठी प्रत्येकी एकच बोलीदार समोर आला आणि त्याने सर्व अटी पूर्ण करून त्या खरेदी केल्या. अनेक वर्षे रखडलेल्या या मालमत्तांच्या लिलावाला अखेर यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts