Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळून ४ जणांचा मृत्यू

parayagraj

prayagraj news : प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे सोमवारी दुपारी सुमारे १:३० वाजता मोठ्या स्फोटानंतर एका कोल्ड स्टोरेज (Cold storage) इमारतीचा भाग कोसळल्याने अपघात झाला.या घटनेत चार कामगारांचा मृत्यू (Four Workers Dead) झाला आहे. मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये पिलाट चौधरी (pilat chaudhary), मशींदर (mashindar), ज्योतिष (jyotish) आणि जगदीश (jagdish) यांचा समावेश आहे.जगदीश हा प्रयागराजचा रहिवासी होता, तर उर्वरित तिघे बिहारमधील होते. मात्र, प्रशासनाने अद्याप अधिकृतपणे मृत्यूची पुष्टी केलेली नव्हती. स्फोटानंतर अमोनिया वायू गळतीमुळे बचावकार्यात अडथळे येत असून, प्रशासन व एनडीआरएफचे पथक मदतकार्य करत आहे.

हे ही वाचा: एपस्टीन फाईलवाला प्रधानमंत्री देशाला नको; वंचितचा RSS मुख्यालयावर आक्रोश मोर्चा

२० कामगार ढिगाऱ्याखाली

या अपघातात सुमारे २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. आतापर्यंत १७ जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचावकार्य सुरू

प्रशासनाने बचावकार्य सुरू ठेवले असून सात जेसीबी मशीनचा वापर केला जात आहे. तसेच SDRF आणि NDRFच्या टीम्स घटनास्थळी पोहचले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बचावकार्य सुरू ठेवण्यासाठी प्रकाशयोजनेची व्यवस्था केली जात आहे.

मलबा हटवण्याचे काम सुरू

अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे. अंधार पडत असताना प्रशासनाने प्रकाशाची व्यवस्था सुरू केली असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. याची माहिती प्रयागराजचे पोलिस आयुक्त जोगिंदर कुमार यांनी दिली.

 

प्रयागराज कोल्ड स्टोरेज अपघाताचे मुख्य मुद्दे:

घटनास्थळ: फाफामऊ, प्रयागराज, रुदापूर येथील सपा नेते आणि माजी आमदार अन्सार अहमद यांच्या मालकीचे कोल्ड स्टोरेज.

अपघाताचे कारण: जर्जर इमारत कोसळली आणि अमोनिया वायूची पाईप फाटल्याने विषारी गळती सुरू झाली.

बळी आणि बचावकार्य: सुरुवातीच्या अहवालानुसार ४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकांचे प्राण गेल्याची भीती आहे. १७ लोकांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.

परिणाम: अमोनिया गळतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सरकारची कारवाई: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून, मृतांच्या कुटुंबीयांना २-२ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts