Budget Laptops: नुकताच ॲपल मॅकबुक निओ (Apple MacBook Neo ) भारतात लॉन्च झाला असून, बजेट सेगमेंटमध्ये अँपलने एंट्री घेतली आहे. हा लॅपटॉप स्वस्त असला तरी फीचर्सच्या बाबतीत काही इतर लॉपटॉप त्यापेक्षा पुढे आहेत. कमी किमतीत जास्त RAM, स्टोरेज आणि मोठी स्क्रीन देणारे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. अशाच 5 बजेटमधील लॅपटॉप्सबद्दल जाणून घेऊयात आजच्या खास लेखात.
नुकताच ॲपल मॅकबुक निओ (Apple MacBook Neo ) भारतात लॉन्च झाला आहे. हा लॅपटॉप बजेट सेगमेंटसाठी आहे. Apple चा MacBook Neo (सुरुवातीची किंमत 69,999) बाजारात आला असला, तरी त्यात मर्यादित RAM, स्टोरेज आणि लहान डिस्प्ले आहे. दुसरीकडे, इतर ब्रँड्स याच किंमतीत किंवा कमी किमतीत अधिक शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स देतात. जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर हे पर्याय नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
हेही वाचा: ना फेसबुक, ना गूगल! ‘हा’ देश अजूनही डिजिटल युगापासून दूर, जाणून घ्या लोक कसे जगतात
एसर एस्पायर 16 एआय (Acer Aspire 16 AI)
एसर एस्पायर 16 एआय (Acer Aspire 16 AI) ची किंमत सुमारे 55,000 ते 65,000 आहे. यात Qualcomm Snapdragon X प्रोसेसर दिला आहे. यामध्ये 16GB RAM आणि 512GB स्टोरेज आहे. 16 इंचाचा 1920×1200 रिझोल्यूशन असलेला IPS टच डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. 65Wh बॅटरी सामान्य वापरात 21 तासांपर्यंत टिकू शकते. हा लॅपटॉप लोकल एआय कामांसाठी डिझाइन केलेला आहे आणि तो विंडोज 10 वर चालतो.
लेनोवो आयडियापॅड स्लिम (Lenovo IdeaPad Slim)
लेनोवो आयडियापॅड स्लिम सुमारे 60,000 ते 70,000 च्या किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये इंटेल कोर 5 210H प्रोसेसर आहे. 15.3 इंचाचा मोठा डिस्प्ले उपलब्ध आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज, तसेच मायक्रोएसडी स्लॉट आहे. मोठ्या स्क्रीनमुळे हा लॅपटॉप मल्टीटास्किंगसाठी योग्य आहे.
एचपी व्हिक्टस (HP Victus)
एचपी व्हिक्टस हा एक १५.६ इंचाचा गेमिंग लॅपटॉप आहे, ज्याची किंमत अंदाजे ५२,००० पासून सुरू होते. यामध्ये एएमडी रायझन ५ ७५३५एचएस प्रोसेसर आणि एनव्हिडिया आरटीएक्स २०५० जीपीयू आहे, जे १०८०पी गेमिंगसाठी उत्तम आहे. १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला १५.४ इंचाचा एफएचडी अँटी-ग्लेअर डिस्प्ले. यामध्ये ५१२जीबी स्टोरेज आणि एसडी कार्ड स्लॉट आहे.
सॅमसंग गॅलेक्सी बुक4 (Samsung Galaxy Book4)
सॅमसंग गॅलेक्सी बुक4 ची किंमत अंदाजे 62,000 आहे. यामध्ये इंटेल कोअर 7 150U प्रोसेसर आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे, जे पुढे वाढवता येते. 15.6 इंच फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, फुल-साईज कीबोर्ड (नंबर पॅडसह), फिंगरप्रिंट सेन्सर आणि इथरनेट पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. हा लॅपटॉप विंडोज 11 वर चालतो आणि विविध स्क्रीन साईजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.











