• Home
  • देश
  • अमेरिकेत रिफायनरीमध्ये भीषण स्फोट; टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्र पेटलं, आणीबाणी जाहीर
Top News

अमेरिकेत रिफायनरीमध्ये भीषण स्फोट; टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्र पेटलं, आणीबाणी जाहीर

texas blast

Valero Refinery Explosion Texas | अमेरिकेत (US) मोठा स्फोट झाला आहे. अमेरिकेच्या टेक्सास (Texas) राज्यातील पोर्ट आर्थर येथील ‘वलेरो एनर्जी’ (Valero Energy) या मोठ्या तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली. या घटनेमुळे आकाशात सर्वत्र काळपट धुराचे लोट पाहायला मिळत होते.

हेही वाचा – अंधश्रद्धेचा गैरफायदा! ‘अप्सरा’ असल्याचं सांगत खरातनं महिलेवर केला अत्याचार, आणखी एका महिलेचा धक्कादायक खुलासा

‘वलेरो एनर्जी’ तेल रिफायनरीमधील इंडस्ट्रीयल हीटरमध्ये भीषण स्फोट

‘वलेरो एनर्जी’ या तेल रिफायनरीमधील (Valero Fuel Station) एका इंडस्ट्रीयल हीटरमध्ये भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण परिसरात आगीचा फडका उडला. सायंकाळी 6.30 च्या सुमारास हा स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचे हादरे शेजारील नेदरलँड आणि ग्रोव्ह्स या शहरांमध्येही जाणवले. या स्फोटानंतर आगीचा मोठा फडका उडाला होता.

भीषण स्फोटानंतर प्रशासनाने अलर्ट होत नागरिकांना केले सतर्कतेचे आवाहन

या भीषण स्फोटानंतर प्रशासनाने अलर्ट होत पोर्ट आर्थमधील पश्चिम भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जेणेकरून विषारी वायूचा कोणाला त्रास होणार नाही.

‘वलेरो एनर्जी’ या तेल रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तसेच या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये. तर सध्या घटनास्थळी तातडीनं अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

स्फोटानंतर अमेरिकेतील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम?

‘वलेरो एनर्जी’ ही रिफायनरी सर्वात मोठी रिफायनरी आहे. ती दररोज सुमारे 3,80,000 बॅरल तेल प्रक्रिया करण्याची अवाढव्य क्षमता राखते. तर आता या रिफायनरीत भीषण स्फोट झाल्यामुळे येथील कामकाज काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर कामकाज ठप्प झाले तर अमेरिकेतील इंधन पुरवठ्यावर आणि इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या भीषण स्फोटानंतर अमेरिकेचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे अमेरिकेत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts